28 आणि 29 एप्रिल ला सुजलाम सुफलाम मध्ये थिरकणार पावले

– ‘सुजलाम सुफलाम’ मध्ये थिरकणार पावले.

– 28 ला आंतरशालेय नृत्यस्पर्धा

– 29 ला नृत्यकला भूषण बाल पुरस्कार सोहळा

नागपूर :- शालेय विद्यार्थ्यांमधील नृत्यकलेला वाव ‘ सुजलाम सुफलाम’ या आंतरशालेय नृत्यस्पर्धेचे आयोजन रविवारी २८ एप्रिल रोजी, करण्यात आले आहे. दिल्ली पब्लिक स्कूल, मिहानच्या प्रेक्षागृहात ही स्पर्धा होईल. कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडिया आणि दिल्ली पब्लिक स्कूल, मिहान यांच्या विद्यमाने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय नृत्यदिनानिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली आहे. एकल व समूह अशा दोन प्रकारांमध्ये विद्यार्थी आपले नृत्य सादर करतील. वय वर्षे ५ ते १० आणि ११ ते १६ अशा दोन गटांत एकलनृत्य तर ५ ते १६ वयोगटांत समूहनृत्य स्पर्धा होईल. स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी माउंट लिटेराजी स्कूल बेसाच्या प्राचार्या डॉ. वंदना पॉल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. व भारतातील चयनित बाल नृत्य कलाकारांचा नृत्य कला भूषण पुरस्कार सोहळा वस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिल्ली पब्लिक स्कूल, मिहानच्या प्रेक्षागृहात दि. 29 एप्रिल रोजी सकाळी १० वाजता. आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धेतील भाग घेण्याकरिता इच्छुकांना कुणाल आनन्दम यांच्याशी ९८३४८५७६९९ किंवा ८०८७४७६१५७, ९८३४८५७६९९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. असे प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्र विज्ञान पदविका अभ्यासक्रमांसाठी १० जूनपर्यंत अर्ज करा

Fri Apr 26 , 2024
नागपूर :- केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतंर्गत हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका या तीन वर्षीय अभ्यासक्रमांसाठी दिनांक १० जूनपर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग आयुक्त अविष्यांत पंडा यांनी दिली. भारतीय तंत्रविज्ञान संस्था बरगढ (ओडिशा) येथे प्रथम वर्षासाठी महाराष्ट्र राज्यातून १३ जागा, व आर्थिक दृष्या दुर्बल घटकातील एका जागेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच वेंकटगिरी येथे दोन जागेसाठी प्रवेश देण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com