हातमाग व वस्त्रोद्योग तंत्र विज्ञान पदविका अभ्यासक्रमांसाठी १० जूनपर्यंत अर्ज करा

नागपूर :- केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतंर्गत हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका या तीन वर्षीय अभ्यासक्रमांसाठी दिनांक १० जूनपर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग आयुक्त अविष्यांत पंडा यांनी दिली.

भारतीय तंत्रविज्ञान संस्था बरगढ (ओडिशा) येथे प्रथम वर्षासाठी महाराष्ट्र राज्यातून १३ जागा, व आर्थिक दृष्या दुर्बल घटकातील एका जागेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच वेंकटगिरी येथे दोन जागेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. व्दितीय वर्षासाठी तीन जागा असून यापैकी एक जागा आर्थिक दुर्बल घटकाचे विद्यार्थ्यांसाठी आहे.

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी विहित नमुन्यातील अर्ज १० जून २०२४ पर्यंत स्विकारण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासंदर्भातील तसेच प्रवेश अर्जाचा नमूना वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्‌ध आहे. अर्जाचा नमूना जूने सचिवालय येथील वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर तसेच विदर्भातील पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रादेशिक उपायुक्त कार्यालय, प्रशासकीय भवन क्रमांक २, आठवा माळा, सिव्हील लाईन, नागपूर दूरध्वनी क्रमांक 0712-2537927 येथे उपलब्ध आहे. विदर्भातील पात्र विद्यार्थ्यांनी हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त  सीमा पांडे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

QR कोड स्कॅन करून मिळवा उद्यानाची माहिती अन् नोंदवा अभिप्राय

Fri Apr 26 , 2024
– मनपाच्या २६ उद्यानात “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम” सुरु होणार नागपूर :- सर्वत्र वाढते शहरीकरण आणि गगनचुंबी इमारतींच्या मध्ये मानवाला थेट निसर्गाशी जोडण्याचे एक सुंदर माध्यम म्हणजे उद्यान, सुदृढ आरोग्य, शुद्ध हवा आणि निसर्गाचा स्पर्श अनुभवता येणाऱ्या उद्यानात विविध रंगीबेरंगी फुले, हिरवळ आणि पक्षांचा किलबिलाट मनाला आनंद देतो. आपण ज्या उद्यानात बसून निसर्गाशी हितगुज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com