बिलकीस बानो प्रकरण ‘फास्ट ट्रॅक कोर्टात’ चालवा! -शहराध्यक्ष दीपक वासनिक..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– वंचित बहुजन आघाडीची मागणी

 कामठी ता प्र 3 :- गुजरातमधील बिलकीस बानो प्रकरणात दाखल याचिकेवरील सुनावणी शीघ्रगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्टात) चालवून न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी कामठी शहर च्या वतीने स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे तेव्हा या स्वाक्षरी अभियानात जास्तीत जास्त नागरिकानी सहभागी व्हावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे कामठी शहराध्यक्ष दीपक वासनिक यांनी कामठीत आयोजित बैठकीत व्यक्त केले.याप्रसंगी कामठी मौदा विधानसभा अध्यक्ष सी सी वासे,माजी नगरसेवक दादा कांबळे ,नागपूर जिल्हा पदाधिकारी नरेश वाघमारे, माजी नगरसेवक प्रशांत नगरकर,माजी नगरसेविका मोहलता मेश्राम,आदी पदधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

गुजरात मध्ये २००२ मधील हिंसाचाराच्या घटनेत बिलकीस बानो यांच्यावर अत्याचार करण्यात आला तसेच त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली.या प्रकरणात ११ आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा झाली;मात्र यासंदर्भात गुजरात सरकारने एक समिती गठीत करून आरोपींना मुक्त करण्यात आले. त्यामुळे बिलकीस बानो प्रकरणात दाखल याचिकेवर ‘फास्ट ट्रॅक कोर्टात’ सुनावणी चालवून बिलकीस बानो यांना तातडीने न्याय देण्यात यावा,अशी मागणी वंचित बहुजन आघाडी कामठी शाखेच्यावतीने करण्यात येत असून यासाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे. हे स्वाक्षरीचे निवेदन सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे पाठविण्यात येणार आहे. तेव्हा या स्वाक्षरी अभियानात सर्वांनी सहभाग नोंदवावा अशी मागणी कामठी मौदा विधानसभा अध्यक्ष सी सी वासे,कामठी शहराध्यक्ष दीपक वासनिक,सल्लागार प्रमोद(दादा)कांबळे, कृपाशंकर ढोके, रामुजी सांगोडे ,प्रशांत नगरकर, नरेश वाघमारे, मोहलता मेश्राम,उपाध्यक्ष नितेश नागदेवें,अविनाश गजभिये, डॉ संजय शेंदरे, शकील अहमद,महासचिव राजेश ढोके, सचिव अजय मेश्राम,प्रवक्ता यशवंत शेंडे, सदस्य तुषार खोब्रागडे,भाऊराव मेश्राम,सुनील बहादूरे,विकास जामगडे,संघपाल चव्हाण,अमर पिललेवान,शीतल तांबे आदींनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वनविभागाच्या क्षेत्रात अवैध मुरुम उत्खनन करताना टिप्पर व जेबीसी जप्त..

Tue Oct 4 , 2022
अमरदिप बडगे,प्रतिनिधी  गोंदिया :- वनपरिक्षेत्र तिरोडा अंतर्गत सहवनक्षेत्र नियत क्षेत्र मुंडीकोटा मौजा घोगरा गट क्रमांक 422 जंगली झुडपी वनविभाग येथे जेसीबीच्या साह्याने मुरूम खोदकाम करून टिप्परच्या साह्याने वाहतूक करीत असल्याचे विश्वसनीय गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 2 ऑक्टोंबर ला सकाळी साडेनऊच्या सुमारास माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र कार्यालय तिरोडा येथे सर्व वनपरिक्षेत्र कर्मचारीसह मिळून मौजा घोगरा गट क्रमांक 422 जंगली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com