संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पक्षाच्या वतीने नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांची माहिती देण्यासाठी तसेच शेतकरी ,शेतमजूर,नागरिक विद्यार्थी यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी 11 फेब्रुवारी पर्यंत गाव चलो अभियान राबविण्यात येत असून आज शनिवारी विधान परिषदेचे आमदार तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी तालुक्यातील वडोदा येथे घरोघरी जाऊन नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांची माहिती देऊन शेतकरी,शेतमजूर ,नागरिक ,विद्यार्थी यांच्या समस्या जाणून घेत आहे.सायंकाळी मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या वडोदा गावातील विनोद बावनकुळे यांच्या घरी भोजनाचाAअ आस्वाद घेत स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले तसेच गावातील अनेक नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी हितगुज केले .
यावेळी आमदार टेकचंद सावरकर, माजी जी प सदस्य अनिल निधान, भाजप नागपूर जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे, संकेत बावनकुळे, कपिल गायधने,रमेश चिकटे, संजय मोटघरे, अजय बोढारे,अरविंद गजभिये,जीवन मुंगले,विकास गिरी,भाजप तालुकाध्यक्ष उमेश रडके, माजी तालुकाध्यक्ष किशोर बेले,विजय कोंडुलवार ,ऍड आशिष वंजारी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.