शहर स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात

– मनपाच्या एक-तारीख, एक-तास, एक-साथ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर शहर साकारण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने शुक्रवारी (ता.१) सकाळी राबविलेल्या “एक तारीख- एक तास- एक साथ” या अभिनव उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. मनपाच्या दहाही झोन मधील नागरिकांनी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत श्रमदान केले.

मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी देखील एक तारीख-एक तास – एक साथ उपक्रमात सहभागी होत लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या परिसरात श्रमदान केले. मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी स्वतः परिसर झाडूने स्वच्छ केला. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी मनपाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, लक्ष्मीनगर झोनचे झोनल अधिकारी रामभाऊ तिडके यांच्यासह तेजस्वीनी महिला मंचच्या स्वयंसेविका व संबंधित झोनचे सहायक आयुक्त, मनपाचे अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला स्वच्छता कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

मनपाच्या दहाही झोन मधील विविध ठिकाणी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसर, धरमपेठ झोन अंतर्गत न्यू रिझर्व्ह बँक, आनंद नगर समोर, सिव्हिल लाईन्स, हनुमान नगर झोन अंतर्गत जुनी शुक्रवारी, धंतोली झोन अंतर्गत पवार सभागृह जवळ, कुकडे लेआउट, रामेश्वर, नेहरूनगर झोन अंतर्गत कल्लु कबाडी शिवणकर नगर, शिवणकर नगर झोपडपट्टी, गांधीबाग झोन अंतर्गत बजेरिया, बिंझानी कॉलेज मार्ग महाल, सतरंजीपुरा झोन अंतर्गत मनपा शाळेजवळ बस्तरवारी, लकडगंज झोन अंतर्गत पारडी शिवशक्ती नगर, नवीन नगर, श्याम नगर, दुर्गा नगर, पुनापूर गाव, पुनापूर घाट, आशीनगर झोन अंतर्गत व्हॉलिबॉल मैदान वैशाली नगर, मंगळवारी झोन अंतर्गत सुदर्शन कॉलनी बेझनबाग झोपडपट्टी, जरीपटका जिंजर मॉलच्या मागे येथे नागरिकांनी अस्वच्छ परिसराची साफसफाई करुन परिसर स्वच्छ केला.

रस्त्यावरील पालापाचोळा, झाडाच्या फांद्या आदी उचलून कचरा गाडीत टाकण्यात आले. तसेच स्वच्छ करण्यात आलेला परिसर पुन्हा अस्वच्छ होवू नये, लोक तिथे पुन्हा कचरा टाकू नये म्हणून त्या ठिकाणी संबंधित झोनचे सहायक आयुक्त सर्वश्री मिलिंद मेश्राम, प्रकाश वराडे, हरीश राउत, घनशाम पंधरे, गणेश राठोड, श्रीमती पुष्पगंधा भगत यांच्या मार्फत जनजागृती करण्यात आली. यावेळी नागरिक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी या सर्वांनी स्वच्छतेसाठी श्रमदानाच्या या उपक्रमात सक्रियपणे सहभाग नोंदविला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा चुनाव 2024: बीजेपी उम्मीदवारों की पहली लिस्ट आज हो सकती है जारी, देर रात तक चली CEC की बैठक, PM मोदी भी रहे शामिल

Sat Mar 2 , 2024
नई दिल्ली :- लोकसभा चुनाव 2024 को लेकर उम्मीदवारों की पहली सूची को अंतिम रूप देने के लिए बीजेपी की केंद्रीय चुनाव समिति (CEC) की बैठक गुरुवार (29 फरवरी) को दिल्ली स्थित पार्टी मुख्यालय में देर रात तक चली. रात करीब डेढ़ बजे नेताओं का मुख्यालय से बाहर आना शुरू हुआ. बीजेपी अध्यक्ष जेपी नड्डा की अध्यक्षता में हुई इस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com