पो.स्टे. खापा हद्दीमधील बाजारचौक येथील ऑनलाईन जुगार अड्डयावर धाड, पोलीस स्टेशन खापा यांची कारवाई 

खापा :- दिनांक ०६/०५/२०२३ रोजी पोलीस स्टेशन खापा येथील स्टाफ पोलीस अधिक्षक यांचे आदेशान्वये अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन खापा येथील बाजारचौक येथील नगरपरीषदेचे संकुलामध्ये काही इसम अवैध ऑनलाईन लॉटरी या प्रकारचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पोलीस स्टेशन खापा येथील स्टाफला प्राप्त झाले वरून सदर स्टाफ यांनी बाजारचौक खापा येथे जावुन बाजारात पाहणी केली असता नगरपरीषद संकुलातील पश्चिम बाजूस मागे गाळा नं. ०५ येथे लोकांची गर्दी दिसली. तेथे पोलीसांना पाहुन काही लोक पळु लागले. त्यांना स्टाफच्या मदतीने पकडण्यात आले. सदरचे ऑनलाईन लॉटरी सेंटर है सलीम लॉटरी सेंटर या नावाने असुन त्या ठिकाणी सापळा रचुन छापा टाकून आरोपी नामे- १) सलीम शेख अजीज शेख, वय ३० वर्ष, य. सावनेर २) विकास दादाराव चोखादे वय २४ वर्ष, रा. हिंगणा ता. सावनेर ३) निलेश नारायण कुंभारे, वय २७ वर्ष, ४) रविंद्र नत्थु तवले, वय ३५ वर्ष, रा. रायडोंगरी ५) नितीन किशोर खोरगडे, वय २७ वर्ष ६) युवराज आनंदराव तिवाडे वय २९ वर्ष, रा. वाकोडी ७) समीर मेहबुब पटेल वय १९ वर्ष, रा. कसाईपुरा खापा ८) राज शंकर धुर्वे, वय २३ वर्ष, रा. खापा ९) रशिद शेख जाकीर शेख वय २३ वर्ष, रा. खापा १०) मंगेश मारोती उईके, वय २८ वर्ष, रा. कोदेगाव १९) विक्की तेजराव निखार वय २४ वर्ष रा. खापा १२) राहुल श्रावण कुंभारे, वय २१ वर्ष, रा. खापा १३) रोशन हबीब शेख, वय ३५ वर्ष, रा. खापा १४) कईम शेख ईतातठल्हा शेख वय ४२ वर्ष, रा. खापा १५) ज्ञानेश्वर सुरेश नंदनवार, वय २४ वर्ष, रा. खापा १६) गोपाल रामचंद्र खडसे, वय ४५ वर्ष, रा. खापा १७) मोहन महादेव मुरड, वय ४२ वर्ष, रा. खापा १८) महेमुद रज्जाक शेख, वय ४८ वर्ष, रा. खापा १९) करीम रफीक शेख वय ३५ वर्ष, रा. खापा हे लोकांकडुन पैसे घेवुन ऑनलाईन मशिनवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळतांनी मिळुन आले. एकुण १९ जुगारी इसम यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातून १) नगदी ३७६००/-रु. व गल्ल्यातील नगदी ५७५७/- रु. तसेच ऑनलाईन असणान्या मशीन व ईतर साहीत्य किंमती अंदाजे ४३२०० /- रु. १६ मोबाईल किंमती अंदाजे १०,३०००/- रु. असा एकूण किंमती अंदाजे १,८९,५५७/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीताविरूध्द पोलीस ठाणे खापा येथे कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवुन आरोपीतांना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाही करीता पोलीस ठाणे खापा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले परि सहायक पोलीस अधिक्षक अनिल मस्के, परि पोलीस उपअधिक्षक राहुल झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोरकर, सहायक फौजदार प्रमोद बन्सोड, पोलीस हवालदार अंकुश लाखे, पोशि अभिषेक पांडे व आरसीपी पथक ईतर पोलीस स्टेशन स्टाफ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोटर सायकल चोरी करणारा आरोपी गजाआड पोलीस स्टेशन सावनेर नागपुर ग्रामिण ची कारवाई 

Tue May 9 , 2023
सावनेर :- दिनांक ०७/०५/२०२३ रोजी पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर ठाणेदार पोलीस स्टेशन सावनेर यांनी पोस्टे सावनेर अप क्र. ३००/२०२३ कलम ३७९, ३४ भादवि व अप क्र. २४७ / २०२३ कलम ३७९, ३४ भादवि चे गुन्हयाचे तपास कामी नियुक्त केलेले डीबी पथक मधील पोलीस उपनिरीक्षक व्यंकटेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com