आगीत होरपळून इसमाचा मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नयागोदाम परिसरात आपल्या राहत्या घरातील खोलीत झोपेत असलेल्या विवाहित इसमाच्या खोलीत शॉर्ट सर्किट ने लागलेल्या आगीत जळून होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 10 दरम्यान घडली असून मृतकाचे नाव आसिफ अख्तर वल्द अब्दुल कदीर वय 45 वर्षे रा. नयागोदाम कामठी असे आहे,.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतकाची पत्नी ही सकाळी झोपेतुन उठून आपल्या दोन्ही मुलांची शाळेची तयारी करून मुलांना शाळेत पोहोचविण्यासाठी गेले असता मृतक पती आपल्या खोलीत झोपले होते दरम्यान मृतकाची पत्नी मुलाना शाळेत सोडुन घरी परतले असता मृतक पतीच्या खोलीतुन धूर निघत होता तर दार आतुन बंद होता यावेळी मदतीचे आव्हान करीत शेजाऱ्याकडे मदतीची धाव घेतली असता शेजारी मंडळींनी दार तोडले नंतर मृतक हा आगीत होरपळून मृतावस्थेत आढळल्याने सर्वांना एकच धक्का बसला.ही आग शॉर्ट सर्किट ने लागली असल्याचे सांगण्यात येत असून सुदैवाने पत्नी व मुले घराबाहेर असल्याने मोठी जीवितहानी टळली .

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक पवार तसेच अग्निशमन अधिकारी निलेश वाडेकर आदींनी घटनास्थळ गाठून आगधुकेमय परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश गाठले.तर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी यासंदर्भात घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे तर या घटनेत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी लठ्ठपणा नियंत्रित करा : डॉ राजेंद्र बडवे

Tue Oct 18 , 2022
राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रकुल पदक विजेत्या अविनाश साबळेला परमार्थ खेल रत्न प्रदान’  टाटा रुग्णालयाला किमोथेरपी केंद्र बांधून देण्याची परमार्थ सेवा समितीची घोषणा      डॉ.राजेंद्र बडवे, डॉ शैलेश श्रीखंडे परमार्थ सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित मुंबई :- टाटा स्मृती रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे व उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे यांना त्यांच्या कर्करोग उपचार, शल्यक्रिया व संशोधनातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘परमार्थ रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com