भिलगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या घरात आढळले 30 च्या जवळपास सापांचा झुंड

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- साप म्हटलं की कुणालाही भिती वाटते असेच भीतीदायक असलेल्या 30 च्या जवळपास सापांचा झुंड कामठी तालुक्यातील भिलगाव ग्रा प मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारी दिनेश गिरपे नामक कर्मचाऱ्याच्या घरात आढळल्याने एकच खळबळ माजल्याची घटना नुकतेच दीवसाढळ्या दुपारी 12 दरम्यान घडली.

प्राप्त माहितीनुसार ग्रा प कर्मचारी दिनेश गिरपे हे काही कामानिमित्त परवा दुपारी घराबाहेर पडले असता घरात पत्नी व एक मुलगा होता.दरम्यान घरात 1 फूट लांबीचे चार सापाचे पिल्ले दिसल्याने घरात भीतीमय वातावरण पसरल्याने मदतीची ओरड करण्यात आली. शेजारी मंडळींनी मदतीची धाव घेत सर्पमित्राला बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येते.

हळुवार का होईना घरामगिल बाजूने एका खुले प्लॉट वरील डबक्यातून व म्हशीच्या गोठ्यातुन हे सापाचे पिल्ले येत असावे असा अंदाज लावण्यात येत असून घरात जवळपास 30 च्या वरील सापाचे पिल्यांचे झुंड एकत्र आल्याने घरात भीतीमय वातावरण पसरले होते मात्र वेळीच सर्पमित्राची मदत मिळाल्याने अनर्थ टळला. सध्या कुठलीही भीतीमय परिस्थिती नसून घरामगिल डबक्यात साचलेल्या पाण्यातुन हे साप आले असावे असा अंदाज लावण्यात येत असले तरी भविष्यात याप्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती न व्हावी यासाठी खुले डबके , आदींवर नियंत्रण साधावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुरात पुन्हा मतदान घ्या, अपक्ष उमेदवारांची संयुक्तपणे मागणी 

Thu Apr 25 , 2024
नागपूर :- 19 एप्रिलला नागपुर मतदार संघात झालेल्या लोकसभा निवडणुकीत कमी मतदानाने प्रमुख राजकीय पक्षांची चिंता वाढलेली असताना मतदार यादीतील गोंधळ हजारो मतदार मतदाना पासून वंचित झाल्याने अनेक अपक्ष उमेदवारांनी आज बुधवारी संयुक्तपणे पत्रपरिषदेत संताप व्यक्त केला. नागपुरात पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली. शासन,प्रशासन घोळात निवडणुकीवर सामान्य जनतेचा विश्वास उरलेला नाही हे या निवडणूकीतून स्पष्ट झाले आहे. भाजपचे उमेदवार नितीन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com