सौहाद्रपूर्ण वातावरणात हनुमान जन्मोत्सव साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– हनुमान जयंती शोभायात्रेने कामठी शहर दुमदुमले

– ठीक ठिकाणी स्वागत व प्रसादाचे वितरण ,नयनरम्य चित्ररथाने कामठीकरांचे पारडे फेडले

कामठी :-दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हनुमान जन्मोत्सव निमित्त आज 24 एप्रिल ला हनुमान जयंती उत्सव समितीच्या वतीने हनुमान जन्मोत्सव शोभायात्रा काढण्यात आली . तसेच या हनुमान जयंती उत्सव शोभायात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून हनुमान शोभायात्रेने कामठी शहर दुमदुमले.

मागील कित्येक वर्षापासून हनुमान हन्मोत्सव समितीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या हनुमान जन्मोत्सव शोभायात्रेची परंपरा ही कायम ठेवत निघालेल्या या हनुमान जन्मोत्सव शोभायात्रा सौहाद्रपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.

या हनुमान जन्मोत्सव शोभायात्रेचा शुभारंभ गांधी चौक येथे सजविलेल्या रथावरील हनुमान जी च्या मूर्तीची आमदार टेकचंद सावरकर, माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे,माजी खासदार विलास मुत्तेमवार,माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांचे हस्ते पूजा आरती करून करण्यात आली .यावेळी ,माजी आमदार देवराव रडके,माजी जी प।अध्यक्ष निशा सावरकर, पोलीस उपायुक्त निकेतन कदम, सहायक पोलीस उपायुक्त विशाल क्षीरसागर ,तहसिलदार गणेश जगदाडे,मुख्याधिकारी संदीप बोरकर,ठाणेदार प्रशांत जुमडे ,ठाणेदार प्रमोद पोरे, हनुमान उत्सव समितीचे अध्यक्ष राजेश शर्मा ,अजय अग्रवाल ,पप्पू अग्रवाल, माजी नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअतअन्सारी ,प्रसन्ना तिडके,माजी नगराध्यक्ष ,माजी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मानवटकर ,माजी नगराध्यक्ष नीरज यादव,माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान,राजू हिंदुस्थानी, सोनू गोयल, तुषार दावानी, चंद्रशेखर तुप्पट,कपिल गायधने,रतनलाल बरबटे, मुलचंद सीरिया, लक्ष्मण संगेवार, गिरीश संगेवार , माजी नगरसेवक लालसीग यादव,संजय कनोजिया, प्राध्यापक मनीष वाजपेयी ,तिलक गजभिये,वरिष्ठ पत्रकार चंद्रकांत चौबे,कृष्णा यादव, राधेश्याम हटवार,मुकेश यादव, , रामेश्वर बावनकर, लाला खंडेलवाल,अजय कदम प्रामुख्याने उपस्थित होते.

ही शोभायात्रा बँड ,डीजे ,ढोल ताशे, फटाक्याच्या आतिषबाजी आदिवासी नृत्य ,विविध वेशभूषेत राजे महाराजे, विविध नयन रम्यचित्र रथाची शोभायात्रा पोरवाल चौक ,फेरूमल चौक, रब्बानी चौक, फुलओली चौक, लाला ओली , बोरकर चौक ,कादर झेंडा, राम मंदिर , अय्याजी वस्ताद अखाडा चौक, नेताजी चौक ,मेन रोड ,जुनी ओली , चावडी चोक, दाल ओली, नेहरू मंच मोंढा ,हैदरी चौक ,मोटर स्टँड चौक ,जयस्तंभ चौक ,गवळीपुरा, लकडगंज, जय भीम चौक मार्गे नगर भ्रमण करीत श्री गंज के बालाजी मंदिरात समापन करण्यात आले. शोभायात्रेचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले. शोभायात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जुनी कामठी ठाणेदार प्रशांत जुमडे, नवीन कामठीचे ठाणेदार प्रमोद पोरे यांचे मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाघधरे वाडी कन्हान येथुन दुचाकी चोरी

Wed Apr 24 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- आकाश आंजनकर यांचे वेडींग प्लॅनर चे काम करित असुन सामान ठेवण्याकरिता वाघधरे वाडी येथे गोडाऊन मध्ये ठेवलेली डिस्कव्हर दुचाकी कुणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याची फिर्यादी यांचे तक्रारीवरून पोस्ट कन्हान येथे गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस दुचाकी व आरोपीचा शोध घेत आहे. आकाश भास्करराव आंजनकर वय २७ वर्ष रा. महात्मा फुले चौक वराडा ता. पारशिवनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com