पंजाब नॅशनल बँक विभागीय कार्यालयात पीएम स्वनिधी शिबिर

नागपूर :- पथ विक्रेत्यांच्या व्यवसायाला बळकटी प्रदान करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) पथ विक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजने अंतर्गत खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या अनषंगाने गुरुवार (ता. 14) रोजी पंजाब नॅशनल बँक विभागीय कार्यालय नागपूर येथे प्रधानमंत्री स्वनिधी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निर्भय जैन, समाज कल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे व बँकेचे विभागीय प्रमुख – आशिष चतुर्वेदी प्रामुख्याने उपस्थित होते.

शिबिरात बँकेद्वारे एकूण 636 प्रधानमंत्री स्वनिधी कर्जदारांना खात्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी पंजाब नॅशनल बँकेच्या या प्रयत्नाचे मनपा अतिरिक्त आयुक्त निर्भय जैन यांनी कौतुक केले आणि या योजनेच्या लाभार्थ्यांनी वेळेवर हप्ते भरून दुसऱ्या आणि तिसऱ्या कर्जाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते उपस्थित काही अर्जदारांना त्यांच्या स्वीकृती पत्रे प्रदान करण्यात आली. बँकेचे विभागीय प्रमुख श्री.आशिष चतुर्वेदी यांनी कर्जदारांना प्रधानमंत्री स्वनिधी योजना व प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती दिली व ग्राहकांनी बँकेच्या UPI पेमेंट सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

NewsToday24x7

Next Post

पूर्व नागपूर विधानसभा तामगाडगे च्या नेतृत्वात बसपा ची बैठक संपन्न

Sat Sep 16 , 2023
– बसपा तर्फे संघटन बांधणीवर विस्तृत चर्चा नागपूर :-बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्हा अंतर्गत पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यां सोबत भेट घेऊन संघटन बांधणीवर विस्तृत चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम पदाधिकाऱ्यांनी ओपुल तामगाडगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच सर्वांनी जिल्ह्यामध्ये काम करण्याकरिता आपले समर्थन देवून शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे अगोदर त्यांचें सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन विधानसभेत ज्या पद्धतीने […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com