कामठी नगर परिषद च्या 47 हरकती वरील सुनावणी संपली

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-प्रभाग रचनेच्या अंतिम आराखड्याची वाट,इच्छुकांची आतापासूनच मोर्चेबांधणी
कामठी ता प्र 24:-आगामी काळात होऊ घातलेल्या कामठी नगर परिषद निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून मार्च महिन्यात रद्द करण्यात आलेल्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा सुरू करण्यात आला आहे.त्यानुसार 10 मे ते 14 मे पर्यंत प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदविण्यासाठी संधी देण्यात आली होती त्यामुळे कामठी नगर परिषद च्या प्रभाग रचनेवर एकूण 47 आक्षेपकर्त्यांनी आक्षेप नोंदविले होते.त्याची सुनावणी ची अंतिम तारीख ही जिल्हाधिकारी कडे 23 मे पर्यंत होती. यानुसार काल 23 मे ला जिल्हाधिकारी आर विमला यांच्या कार्यालयात झालेंल्या 47 आक्षेपकर्त्यांच्या हरकती सुनावनी ला अंतिम स्वरूप प्राप्त झाले असून या झालेल्या सुनावणीत अंतिम प्रभाग रचनेत काही बदल होणार का?हे सात जून रोजी स्पष्ट होणार आहे.
प्रसिद्ध झालेली प्रभाग रचना काहींना सोयीचे वाटत होते तर अनेकांना गैर सोयीचे त्यामुळे प्रभाग रचनेच्या संदर्भात राजकीय नेते व इच्छुक उमेदवारांचे खलबते झाली आहेत .
नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहराची ‘ब’वर्ग नगरपरिषद मध्ये नवीन प्रभाग रचनेनुसार नगरसेवकांची संख्या 32 वरून 34 वर गेली आहे.त्यामुळे निवडणुकीत यंदा रंगत वाढणार आहे.या द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीत 34 सदस्यपैकी 50 टक्के महिलांना आरक्षण नुसार 17 महिला ह्या नक्की आरक्षित राहतील .यातील उर्वरित 17 सदस्यपैकी 10 सदस्य हे अनुसूचित जाती साठी आरक्षित राहतील त्यातही अनुसूचित जाती स्त्री की सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण काढण्यात येणार आहे तसेच उर्वरित सात जागेसाठी अनु. जमाती व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत होणार आहे.
हरकती व सूचनांचा अनुषंगाचा अभिप्राय 30 मे रोजी राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाणार असून 6 जून रोजी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देत 7 जून ला कामठी नगर परिषद च्या अंतिम प्रभाग रचनेची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.तर अंतिम प्रभाग रचनेनंतर पावसाळ्याचे वातावरण असूनही शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे हे इथं विशेष!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कापसी (बु)येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भुमीपूजन

Tue May 24 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 24:-गुमथळा महालगाव जिल्हा परिषद सर्कल मधील मौजा कापसी (बु ) येथे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सीमेंट रस्ता बांधकामाचे भूमी पूजन जी प सदस्य .दिनेश ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कामठी पंचायत समिती सदस्य .सोनुताई कुथे – कापसी बु ग्रा प ,सरपंच शामराव आडोळे, सचिव पंकज डांगट, प्रतिष्ठित नागरिक _ गणेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com