कुही :- पोस्टे. कुही हद्दीतील मौजा कुही ते बोडखीपेठ रोडवर माल्याचा गोठयाजवळ जुगार सुरू असल्याबावत गुप्त बातमीदारांकडुन मिळालेल्या खात्रीशिर माहीतीवरून दिनांक २४/०३/२०२४ रोजी पोलीस स्टेशन कुही येथील पोलीसांच्या पथकाने सदर जुगार अड्ड्याची योजनावध्द पद्धतीने आखणी करूण सदर जुगार अड्ड्यावर धाड टाकुण सदर जुगार अडयावर ०८ जुगार खेळणारे आरोपीतांना ताब्यात घेवुन आरोपीतांची अंगझडती घेतली असता त्याचा अंगझडतीमधुन व डावावरूण व घटनास्थळावरूण एकुण २,३१,८७०/- रूपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
कार्यवाही पञ्चक पोलीस पोलीस अधिक्षक हर्ष पोहार (भापोसे) तसेच अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार IPS मा. दिपक अग्रवाल सहा. पोलीस अधिक्षक पोस्टे कुही याच्या नेतृत्वात पोउपनि स्वप्नील गोपाले, पोहवा ओमप्रकाश रेहपाडे, पो. शि. अनिल करडखेले, होमसैनिक आतीश येळणे यांनी यशस्वीपणे पुर्ण केलेली आहे.