सत्रापुर रोड येथे पंचशिल बौध्द विहार व मांग-गारोडी समाज व्दारे धम्म प्रेमीना भोजन वितरण..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – सम्राट अशोक विजय दिवस व धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्य नागपुर जबलपुर राष्ट्रीय महा मार्गावरील कन्हान नदी पुल सत्रापुर रोड जवळ पंच शिल बौध्द विहार व मांग-गारोडी समाज सत्रापुर व्दारे धम्म प्रेमींचे स्वागत करून भोजन वितरण करण्यात आले.

बुधवार (दि.५) ला विश्वविजेता सम्राट अशोक विजय दिवस व धम्मचक्र परिवर्तन दिवसा निमित्य पंचशिल बौध्द विहार व मांग-गारोडी समाज सत्रापुर-कन्हान व्दारे नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरून नागपुर च्या ऐतिहासिक दिक्षा भुमी व ड्रगन पँलेश कामठी येथे देश, विदेश आणि विविध राज्यातुन येणा-या धम्म प्रेमींचे राष्ट्रीय महामार्गा वरील कन्हान नदी पुल सत्रापुर रोड जवळ धम्म प्रेमींचे मा.शंकरराव वाघ मारे, माजी जि प सदस्य मा.अंबादास खंडारे, माजी उपाध्यक्ष नगरपरिषद कन्हान मा. डायनल शेंडे, माजी उपसरपंच कैलास भिवगडे, नेवालाल पात्रे, गजेश यादव, उमेश पौनीकर, भगवान भोवते, राजेश गजभि ये, अजय चव्हाण, विजय वाघमारे, नरेश रामटेके, अश्विन गजघाटे, रोडेकर, भुरा पात्रे, विक्की रोडेकर, हरीश रंगारी हयांच्या प्रमुख उपस्थित स्वागत करून भोजन वितरण करण्यात आले. या भोजनदान कार्य क्रमाच्या यशस्वीते करिता केशव पाटील, विलास उके, विराट खडसे, योगेश इंचुलकर, स्वप्नील वाघमारे, प्रकाश शेंडे, पंजाबराव वाघमारे, अनिल वाहणे, प्रवेश भारती, अतुल पात्रे, सतिश शाहु, मुकेश गायकवाड, प्रियांषु वाघमारे, किटु कराने, गंगाधर डोगरे, आदी रेड्डी, रतन मेश्राम, अनुताई वाघमारे, सुनिता रंगारी, सत्यफु ला वाघमारे, करूणा बागडे, वैशाली नारायणे, निर्मला डोगरे, शारदा मेश्राम, नेहा डोगरे सह पंचशिल बौध्द विहार व मांग-गारोडी समाज सत्रापुर च्या पदाधिकारी, सदस्यानी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नेरी गावात वीज कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली

Fri Oct 7 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील नेरी गावात गतरात्री वादळी पावसात वीज कोसळली. ही वीज हनुमान मंदिरावर कोसळल्याने मंदिराच्या छताला भेगा पडल्या. सुदैवाने जीवितहानी टळली. ही घटना गतसायंकाळी 7.25 वाजता हनुमान मंदिर नेरी येथे घडली. प्राप्त माहीती नुसार नेरी गावातील हनुमान मंदिरात सायंकाळी साडे सात दरम्यान आरती सुरू असताना अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला आणि वीज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com