नेरी गावात वीज कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील नेरी गावात गतरात्री वादळी पावसात वीज कोसळली. ही वीज हनुमान मंदिरावर कोसळल्याने मंदिराच्या छताला भेगा पडल्या. सुदैवाने जीवितहानी टळली. ही घटना गतसायंकाळी 7.25 वाजता हनुमान मंदिर नेरी येथे घडली.

प्राप्त माहीती नुसार नेरी गावातील हनुमान मंदिरात सायंकाळी साडे सात दरम्यान आरती सुरू असताना अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला आणि वीज हनुमान मंदिरावर कोसळली त्यामुळे मंदिरच्या छताला भेगा पडून छताचा काही भाग खाली पडला व मंदिरातील विद्दुत सेवा ही सॉर्टसर्किट झाली. दरम्यान आरती करणारे भक्तगनात भीतीमय वातावरण पसरले मात्र देवकृपेने जीवितहानी टळली याप्रसंगी मंदिरात बबन वंजारी, देवराव खिरेकर, काशीनाथ ठोंबरे, भारत वंजारी, विष्णूूूूू वाडीभस्मे, राजहंस आखरे हे सर्व पूजा करत होते सुदैवाने जीवित हानी टळल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती तहसीलदार अक्षय पोयाम याना देण्यात आली असून संबंधित कर्मचाऱ्यांनि घटनास्थळाची पाहणी करून घटनेची नोंद केली आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

11 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेत पेंशन अदालत..

Sat Oct 8 , 2022
 नागपूर : मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेअंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या तृतीय व चतुर्थ वर्गातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी पेंशन अदालतीचे आयोजन जिल्हा परिषदेतील कै.आबासाहेब खेडकर सभागृह येथे 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी सेवाविषयक लाभाबाबत काही तक्रारी असल्यास पेंशन अदालतीमध्ये उपस्थित रहावे. 11 ऑक्टोबर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com