रेती चोरी करणाऱ्या आरोपीविरूद्ध कारवाई

देवलापार :- अंतर्गत १८ किमी अंतरावर मौजा पुसदा पुर्नवसन दिनांक ११/०५/२०२३ चे १९/०० वा. ते १९.४० वा. दरम्यान पोलीस स्टेशन देवलापार येथील स्टाफ पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, मौजा पुसदा पुर्नवसन येथे काही इसम अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक करीत आहेत. अशा मिळालेल्या माहिती वरून नमुद घटनास्थळी जावून आरोपी नामे- शुभम देवानी महाजन, वय २९ वर्ष, रा. कवडक दुधाळा हा त्याच्या ताब्यातील एक लाल रंगाचा महींद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम. एच. ४० / एल – ६५९२ व लाल रंगाची विना क्रमांकाची ट्राली मध्ये रेती भरून शासनाचा कर चूकवून बिना परवाना गौण खनिज (रेती) ची नाल्यातून चोरी करून व चोरटी वाहतुक करतांनी पंचासमध मिळुन आल्याने त्याचे ताब्यातुन एक लाल रंगाचे महींद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम. एच. ४० / एल ६५९२ व लाल रंगाची विना क्रमांकाची ट्राली किंमती अंदाजे ४५००००/- रु. व १ ब्रास रेती किंमती ५०००/- रू वाहतुक करतांना मिळुन आले. वाहनासह असा एकूण ४५५०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर प्रकरणी सरकार तर्फे पोशि सचिन डायलकर व नं. १५ पोस्टे देवलापार यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. देवलापार येथे आरोपीविरुद्ध कलम ३७९ भादवी सहकलम ३/१८१ १४६/१९६ मोवाका कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला सूचनापत्रावर रिहा करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास सपोनी मेश्राम हे करीत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com