नागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा –  अतिशी

आम आदमी पार्टी, नागपुर – मिशन 2022- आपला महापौर

आप ची नागपूर च्या जनतेला दुसरी गॉरंटी – दर्जेदार शिक्षण (शिक्षणाची हमी)

नागपुर  –  आम आदमी पार्टी येणारी महानगरपालिका निवडणूक जनतेला दिल्ली मॉडेल देण्याकरिता स्वबळावर सर्व जागा लढविणार आहे. आम आदमी पार्टी कडून दि.१८ जून ला नागपूर च्या जनतेला पहिली गॉरंटी १५००० लिटर शुद्ध पाणी मोफत देण्याची दिली आहे. आज आम्ही दुसरी गॉरंटी – दर्जेदार शिक्षणाची देत आहोत.

आपण सर्वांना माहित आहे की दिल्ली मध्ये शिक्षण क्षेत्रात आम आदमी पार्टी च्या सरकार कडून अमुलाग्र बदल करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे. शिक्षणाचे बजेट २२% करून सरकारी शाळा खाजगी शाळेपेक्षा चांगल्या दर्जेदार बनविल्यात. त्यामुळे मागच्या वर्षी चार लक्ष विद्यारर्थ्यांनी खाजगी शाळेतून नावे काढून सरकारी शाळेत प्रवेश घेतला आहे. दिल्लीच्या शाळांचे निकाल सर्वात चांगले यायला लागलेत. सरकारी शाळेमधील विद्यार्थी IIT, AIIMS मध्ये प्रवेश घायला लागलेत.
आता आम्ही हेच दिल्ली मॉडेल नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपुरतात आणण्याची तयारी करीत आहोत.
नागपूर च्या महानगरपालिका शाळांच्या परिस्थितीवर एक नजर – काय होते –
•नागपूर महानगरपालिकेच्या सन १९९५ पर्यंत नागपूरची लोकसंख्या १५ लाख –
•एकूण २७४ – प्राथमीक शाळा + १७ हायस्कूल + २ ज्युनियर कॉलेज मिळून २९३ शाळा होत्या.
•या शाळेतून जवळपास ९०,००० विद्यार्थी शिक्षण घेत होते. आणि शिक्षक संख्या – ३५०० होती.
काय केले –
•नागपूर शहरात मागील १५ वर्षे बीजेपी चे सरकार,
•मागचे पाच वर्षे नागपुरातील मुख्यमंत्री,
•गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात सरकार व मोठे मंत्री नागपुरातील आहेत.
•लोकसंख्या जवळपास ४० लक्ष झालेली आहे. म्हणजे १९९५ च्या तुलनेत २००% लोकसंख्या वाढली,
•बजेट जवळपास १०००% वाढले, २०२१-२२ चे बजेट २२०० करोड – त्यामध्ये शिक्षणाचे बजेट मात्र 3%, दर वर्षी १०० करोड शिक्षणावर खर्च दाखविला जातो परंतु वास्तविकता वेगळीच आहे.
•महानगरपालिकेच्या १५० शाळा जाणूनबुजून बंद पाडण्यात आल्यात.
•आता एकूण शाळांची संख्या बाकी आहे – १३७ (त्यामधून २० शाळा आता बंद होणार आहेत)
•एकूण विद्यार्थी संख्या १९०००, एकूण शिक्षक संख्या – ९००
•बजेट कमी केले, बिल्डींग हालत खराब आहे, सुविधा नाहीत, टॉयलेट, चांगल्या क्लासरूम, क्रीडांगण इत्यादी
•शिक्षकांना ट्रेनिंग नाही, इंग्रजी, गणित व सायन्स करिता ट्रेंड टीचर नाहीत, दुसऱ्या कार्यलयात काम देतात,
•अनेक शाळेत नगरसेवक किंवा मनपाची कार्यालये चालू केलेत, काही शाळेत मेट्रो स्टेशन बनविले, काही बंद आहेत.
•मनपा च्या शाळा भाड्यानी देवून तेथे बीजेपी पदाधिकारी आपली खाजगी शाळा चालवितात.
•लोकसंख्या व शहर वाढत गेले परंतु नवीन एरियात एकही नवीन शाळा काढली नाही.
आम्ही काय करणार – आपले सरकार – इमानदार सरकार
नागपुरात १५६ वार्ड आहेत – १५६ दर्जेदार (दिल्ली मॉडेल प्रमाणे) शाळा तयार करणार.
शिक्षणाचे बजेट १५% पेक्षा जास्त करणार.
शिक्षकांना अद्ययावत ट्रेनिंग देण्याची व्यवस्था करणार.
शाळांच्या इमारती व सोई – सुविधा अद्ययावत करणार ( बिल्डींग, प्रयोगशाळा, वर्ग, स्मार्ट बोर्ड, क्रीडांगणे व इतर सुविधा) चांगला दर्जेदार अभ्यासक्रम राबविणार.
पालक सभा चालू करून पालकांना विश्वास देणार, त्यांचा सहभाग घेणार,जनतेला आवाहन करून जनतेचा सहयोग घेणार.
निशुल्क ट्युशन क्लास चालू करणार.

फंड कोठून आणणार –
शिक्षणाचे बजेट १०% पेक्षा जास्त करणार,संपूर्ण बजेट इमानदारीने खर्च करणार.
पाणीपुरवठा योजनेत १०० करोड बचत करणार.
वारंवार रोड व फूटपाथ निर्माण करून केलेला लावायफळ खर्च कमी करणार.
भ्रष्ट्राचार संपवून पैसे वाचविणार -आठ हजाराचा कुलर ८० हजार रुपयात न खरेदी करता आठ हजारात खरेदी करू.
जाहिरातीच्या माध्यमातून फंड उभारणार .
जनतेचा सहभाग घेणार.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

एकनाथ शिंदे बनेंगे महाराष्ट्र के नए सीएम, फडणवीस ने किया ऐलान

Thu Jun 30 , 2022
मुंबई – महाराष्ट्र की राजनीति में बड़ा उलटफेर हो गया है. एकनाथ शिंदे राज्य के नए सीएम बनने जा रहे हैं. देवेंद्र फडणवीस ने इस बात का ऐलान कर दिया है. उन्होंने कहा है कि बीजेपी इस सरकार में एकनाथ शिंदे का समर्थन करने वाली है. एकनाथ शिंदे शाम 7.30 बजे लेंगे सीएम पद की शपथ भाजपा नेता देवेंद्र फडणवीस ने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com