संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- अनुकंपा बहुउद्देशीय संस्था कन्हान च्या वतीने दिवटे हाऊस तारसा रोड कन्हान येथे मोफत कर्करोग आणि डोळे तापासणी शिबीराचे आयोजन करून १०६ नागरिकांची तपासणी करण्यात आली.
तारसा रोड कन्हान दिवटे हॉऊस येथे अनुकंपा बहुउद्देशीय संस्था कन्हान व्दारे आयोजित मोफत कर्करोग आणि डोळे तपासणी शिबीरात एचसीजी कँंसर सेंटर नागपुरचे डॉ. कमलजीत कौर, हेड ऑफि डॉ. जगताप, आरोग्य अधिकारी डॉ श्रद्धा भगत, डॉ जयश्री मेश्राम या सहकार्याने शिबिरात एच सीजी कर्करोग केंद्राच्या अनुभवी डॉक्टरांनी अत्याधुनिक मशीनच्या मदतीने कर्करोगाची तपासणी करण्या त आली. तसेच तोंडी तपासणी, रक्त तपासणी, स्तना च्या कर्करोगाची आणि डोळ्यांची तपासणी केली.
संभाव्य आजारांचे निदान आणि उपचाराबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. कर्करोगापासुन बचाव करणे शक्य व्हावे म्हणुन एचपीव्ही लसीकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती लाभार्थ्यांना देण्यात आली. या मोफत शिबीराचा १०६ नागरिकांनी लाभ घेतला. शिबीराचे आयोजन समाजसेविका सुनंदा दिवटे संस्था सचिव स्वर्णलता सहारे, सदस्य राहुल सोमकुवर यांनी केले. शिबीरात खासदार श्यामकुमार बर्वे, जि.प.माजी अध्यक्षा रश्मी बर्वे, माजी नगरसेवक राजेंद्र शेंदरे, माजी नगर सेविका सुषमा चोपकर, संगीता खोब्रागडे, अनिता पाटील, राखी परते, स्वाती पाठक, प्रतिक्षा चवरे, रंजना किरपान, अँड. आशा पनिकर, मीना कळंबे, बिरेंद्र सिंह, शैलेश शेळके, आशिष दिवटे, संजय रंगारी, नेवालाल सहारे सह नागरिक उपस्थित होते. शिबीर यशस्वितेकरिता आरोग्य सेविका शालिनी वाल्दे, मंजुषा पडवेकर, धनश्री खेडेकर, प्रियंका सोनबोईर, हरिदास पराते, तुषार लांजेवार, राजेश गांजवे, महेंद्र सांगोडे सह नागरिकांनी सहकार्य केले.