अरोली :- येथून जवळच असलेल्या कोदामेंढीतील ग्रामपंचायत कार्यालयात जलशक्ती मंत्रालय दिल्ली,राज्य पाणी व स्वच्छता मिशन महाराष्ट्र शासन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील भागधारकांसाठी शोध बळकटीकरण व शाश्वतीकरण विषयक दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण नुकतेच पार पडले.
प्रशिक्षणाला गटविकास अधिकारी विजय झिंगरे ,पंचायत विस्तार अधिकारी दोनोडे , स्वच्छ भारत मिशन विभागातील शुभांगी मोडक, निलेश राखडे, प्रशिक्षणाला लाभलेले वक्ते रुपाली दिवसे , अंकुश बुरांगे यांनी मार्गदर्शन केले.
पहिल्या दिवशी त्यांनी जे. जे .एम. अभियानाचा आढावा, समुदाय आधारित शोध व्यवस्थापन ,भारतीय जल धोरणे योजना आणि कार्यक्रम, भूजल अन्वेष पद्धती आणि यंत्रे या विषयांवर तर दुसऱ्या दिवशी समुदाय संचलित भूजल व्यवस्थापन नियोजन ओळख, भूजल पूर्ण पुनर्भरणीय तंत्रे, भूपृष्ठावरील पाण्याचा पुनर्भरण पद्धती ,भूजल पुनर्भरणाच्या नदी नालेय यंत्र या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाला नांदगाव, तोंडली ,अडेगाव ,भांडेवाडी ,बेर्डेपार, अरोली, कोदामेंढी,रेवराल, इंदोरा ,धानोली, वाकेश्वर, राजोली इत्यादी गावातील सरपंच ,उपसरपंच ,अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर, जलजीवन सुरक्षक विभाग कर्मचारी उपस्थिती राहून या कार्यक्रमाची रूपरेषा घेण्यास सक्षम झाले.