राज्यात काल मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक 41 मिमी पाऊस

मुंबई :- राज्यात मागील 24 तासांमध्ये (8 जून रोजी सकाळपर्यंत ) मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक 41 मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड 20.8 मिमी, धाराशिव 13.8 मिमी, ठाणे 7.9 मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात 6.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज 8 जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) : ठाणे 7.9, रायगड ,20.8, रत्नागिरी 6.7, सिंधुदुर्ग 2, पालघर 0.9, नाशिक 3.5, धुळे 1.9, नंदुरबार 0.3, जळगाव 0.9, अहिल्यानगर 5.7, पुणे 3.1, सोलापूर 3.8, सातारा 3.5, सांगली 2.6, कोल्हापूर 3.1, छत्रपती संभाजीनगर 5, जालना 5.3, बीड 1.2, लातूर 4.5, धाराशिव 13.8, नांदेड 0.7, परभणी 2.9, हिंगोली 0.5, बुलढाणा 0.8, वाशिम 0.2, यवतमाळ 0.3, वर्धा 0.1. अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात एलपीजी गॅस टँकरची मिनीबसला धडक होऊन 29 जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. टँकरमधून गॅस गळती थांबवण्यासाठी जेएसडब्ल्यू टीम पोहचली असून गळती थांबवण्याचे काम सुरू आहे.

रायगड जिल्ह्यातील एक व्यक्ती पाण्यात बुडून मृत झाली आहे. तर नाशिक जिल्हा वादळी पावसामुळे एक प्राणी, वीज पडून दोन प्राणी, धुळे व लातूर जिल्ह्यात वीज पडून प्रत्येकी दोन प्राणी आणि जळगाव जिल्ह्यात वीज पडून एक प्राणी मृत झालेले आहे. तसेच वादळी पावसामुळे जालना जिल्ह्यात दोन, जळगाव जिल्ह्यात वीज पडून एक आणि रत्नागिरी जिल्ह्यात रस्ता अपघात मध्ये 29 व्यक्ती आणि 2 प्राणी जखमी झाली असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पाण्याचा पुनर्वापर करीत 'झिरो डिस्चार्ज' संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Mon Jun 9 , 2025
– विदर्भ पाणी परिषदेत उपस्थिती नागपूर :- नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करीत कोराडी येथील ऊर्जा प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याचा पुनर्वापर करीत झिरो डिस्चार्ज ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. पाण्याचा पुनर्वापर करून पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही. जलसंवर्धनातून विकसित महाराष्ट्र घडवू, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!