संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– नागरिकांनी चोप दिल्याने तरुण गंभीर
– कामठी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कन्हान नदी शांती घाट कन्हान नदी पात्रात प्रेमिकाच्या अंत्यसंस्कार शरणावर मद्यधुंद तरुणाने उडी मारण्याचा प्रयत्न करताच उपस्थित नागरिकांनी चोप दिल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी चार वाजता सुमारास घडली असून अनुराग राजेंद्र मेश्राम वय 27 वर्ष राहणार हनुमान नगर कन्हान तालुका पारशिवनी असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे.
नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक अंशिका नितीन खोब्रागडे वय 19 वर्ष राहणार हनुमान नगर कन्हान तालुका पारशिवनी तिचे त्याच परिसरातील राहणाऱ्या अनुराग राजेंद्र मेश्राम वय 27 वर्ष या तरुणांसोबत प्रेम प्रकरण सुरू होते प्रेम प्रकरणात नैराश्य आल्याने अंशिका नितीन खोब्रागडे वय 19 वर्ष तरुणीने दिनांक आठ जून 2025 रोज रविवारला सायंकाळी सात वाजता सुमारास राहत्या घरी बेडरूम मध्ये दुप्पटयाने छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली अंशिकाच्या लहान बहिणीने वडील व आईला घटनेची माहिती देताच वडिलांनी शेजाऱ्याला बोलवून अंशिकाला खाली उतरवून कामठी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले असिका चे वडील नितीन खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीस स्टेशनला कलम 194 बीएनएस नूसार गुन्हा दाखल करून कामठी उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदन करून अंशिकाचे प्रेत दुपारी दोन वाजता नातेवाईकांच्या स्वाधीन केले नातेवाईकांनी आज रोज सोमवारला दुपारी चार वाजता सुमारास कन्हान नदी नदी पात्रात अंशिका च्या मृतदेहावर शरून रचून अग्नी संस्कार सुरू असताना प्रेमवीर अनुराग राजेंद्र मेश्राम वय 27 वर्ष राहणार हनुमान नगर कन्हान तालुका पारशिवनी मद्यधुंद दारूच्या नशेत येऊन अनशिकाच्या जळत्या शरणावर उडी मारू लागला असता उपस्थित नागरिकांनी अनुरागला समजावून लाथा बुक्क्यांनी चोप दिल्याने अनुराग मेश्राम गंभीर जखमी झाला बेशुद्ध अवस्थेत कन्हान नदीपात्रात पडून होता घटनेची माहिती काही नागरिकांनी अनुरागचे वडील राजेंद्र मेश्राम व मोठा भाऊ पवन मेश्राम याला दिली असता दोघेही कन्हान पोलिसांना घेऊन त्यांना कन्हान नदीपात्रात आले व गंभीर जखमी अवस्थेत अनुराग राजेंद्र मेश्राम ला कामठी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असून अनुराग बेशुद्ध अवस्थेत असून आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत घटनेची माहिती नवीन कामठी पोलीस स्टेशनला मिळतात सहाय्यक पोलीस उपायुक्त विशाल शिरसागर ,नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे सहकार्यासह दवाखान्यात येऊन गँभीर जखमी अनुराग मेश्राम ची पाहणी करून घटनास्थळ नदीपात्राची पाहणी केली असून अनुराग राजेंद्र मेश्राम शुद्धीवर आल्यावरच पुढील योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले गंभीर जखमी अनुराग राजेंद्र मेश्राम च्या आई, वडील व भाऊंनी अंशिका खोब्रागडेच्या नातेवाईकांनी मारझोड केल्याने माझा भाऊ अनूराग राजेंद्र मेश्राम गंभीर असल्याचा आरोप केला असून पोलिसांनी योग्य चौकशी करून सबधितांवर योग्य उचित कारवाई करण्याची मागणी अनुरागचे वडील राजेंद्र मेश्राम, मोठा भाऊ पवन मेश्राम व इतर नातेवाईकांनी केली आहे संबंधित प्रकरणासंदर्भात नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले अनुराग राजेंद्र मेश्राम हा शुद्धीवरच आल्यावर योग्य तपास करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे