संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– वाहनासह ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कन्हान :- अवैध देशी दारुची वाहतुक करणाऱ्या आरोपीला कन्हान पोलीसांनी पकडुन त्याचा जवळुन ५३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्राप्त माहिती नुसार शनिवार (दि.७) जुन रोजी सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान, हरिष सोनभद्रे, अमोल नागरे , जीवन विघे, मोहित झाडे, अश्विन गजभिये सह पोली स कर्मचारी अवैध धंध्यावर कारवाई करणे कामी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि गांधी चौक कडुन एक इसम बजाज चेतक मोपेड दुचाकी वाहन क्र. एम एच .४०.सी.के.८०३० वर लाल रंगाचे बोरीत देशी दारु बाळगुन आंबेडकर चौक कडे येत आहे. अश्या माहि ती वरुन पोलीसांनी आंबेडकर चौक येथे नाकाबंदी केली असता एक इसम बजाज चेतक मोपेड वाहनाने वाहतुक करतांनी मिळुन आला, थांबण्याचा ईशारा केला असता चालकाने वाहन थांबविले. पोलीसांनी वाहनाची पाहणी तर एक लाल रंगाची प्लॅस्टीकची बोरी दिसुन आली. त्यात बोरी खोलुन पाहिले असता बोरीमध्ये एकुण १०० प्लॅस्टीकचा निपा देशी दारु भिंगरी संत्रा नं.१ च्या सिलबंद प्रत्येकी १० एम.एल. च्या प्रत्येकी किंमत ३५ रुपये प्रमाणे एकुण ३५०० रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला. चालक शुभम नामदेव रंगारी वय २२ रा. कन्हान याला दारु बाबत परवाना विचारले असता परवाना नसल्याचे सांगितल्याने पोली सांनी चालकास अटक करुन त्याचा जवळुन १०० प्लॅस्टीकचा देशी दारु निपा ३५०० रुपये आणि बजाज चेतक मोपेड वाहन किंमत ५०,००० रुपये असा एकुण ५३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.