संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरूल आशु दा धाबा खंडाळा शिवारातील बसस्टाप येथे अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून हिरालाल पु-हे याचे गळ्यावर व पोटावर कोणत्यातरी धारदार हत्याराने वार करून त्यांना गंभीर जख्मी करून जिवाने ठार करून हत्या केल्याने पारशिवनी पोस्टे ला हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करित अज्ञात आरो पीचा शोध घेत आहे.
हिरालाल लक्ष्मन पू-हे वय ६० वर्ष हे काल रविवार (दि.८) जुन ला दुपारी शंकरपट पाहण्याकरिता उमरेड खमारी येथे गेले होते व शंकरपट पाहुन रात्री परत येवुन नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील आशुदा धाबा खंडाळा शिवारातील बसस्टाप येथे त्यांची दुचाकी घेण्यासाठी गेले असतांनी (दि.८) ला रात्री ८.३० वा. ते १०.१० दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून हिरालाल पु-हे याचे गळ्यावर व पोटावर कोणत्यातरी धारदार हत्याराने वार करून त्यांना गंभीर जख्मी करून जिवाने ठार मारले आहे. अशा फिर्यादी आकाश हिरालाल पु-हे वय २८ वर्ष रा. खंडाळा (डुमरी) ता. पारशिवनी जि. नागपुर यांच्या तोंडी तक्रारीवरुन पारशिवनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राजेशकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनात पो. उप.नि राजेश पिसे हयानी अप क्र.२६०/२०२५ कलम १०३ (१) बीएनएस अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास करित आहे.