उपनगरी रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि क्लेशदायक – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई :- “मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास आहे.

अपघातात जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून दिवंगत प्रवाशांना दु:खद अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यरेल्वेवर कोपर ते दिवा स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करुन दिवंगत प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गळफास घेऊन युवतीची आत्महत्या

Mon Jun 9 , 2025
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- हनुमान नगर येथील रहिवासी नितीन प्रेम दासजी खोब्रागडे यांची मोठी मुलगी अंशिका हिने राहत्या घरी पंख्याला दुपटयाने गळयाला गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन प्रेमदास खोब्रागडे वय ५२ वर्ष रा. हनुमान नगर कन्हान याना दोन मुलीच असुन मोठी मुलगी अंशिका नितीन खोब्रागडे वय १९ वर्ष असुन रविवार (दि.८) जुन ला सायंकाळी ५ वाजता नितीन खोब्रागडे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!