28 नोव्हेंबर नंतर कामठी नगर परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-ओबीसी आरक्षणामुळे खोळंबली नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत

कामठी :- नगर पालिकेत प्रलंबित असलेला ओबीसी आरक्षण आणि राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संदर्भातील याचिकेची उद्या 28 नोव्हेंबर ला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.त्यानुसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.तसेच निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्यानुसार नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत ही राज्य सरकारलाच काढावी लागेल त्यानुसार सरकारने ते आरक्षण काढून कोणत्या ठिकाणी कोणते आरक्षण पडलेले आहे याची माहिती आयोगाला द्यावी त्याआधारे पुढील कार्यवाही आयोगाकडून केली जाणार आहे त्यामुळे 28 नोव्हेंबर नंतर इतर नगर परिषद सह कामठी नगर पदीषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी मागील काळातील नगराध्यक्षपदाच्या आरक्षण संदर्भातील माहिती शासनाकडे पाठविण्यात आली होती .त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण आधीच घोषित करण्यात आले ,सरपंच पदाचेही आरक्षण घोषित करण्यात आले मात्र काही नगर परिषदेत अद्याप निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाला नसल्याने ओबीसी आरक्षणामुळे नगराध्यक्ष आरक्षणाची सोडत लांबणीवर पडत आहे त्यामुळे आता नगर परिषद च्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नेमके कधी निघणार याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विक्रम गोखलेंच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले - देवेंद्र फडणवीस

Sun Nov 27 , 2022
मुंबई :- ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले असल्याची शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमा जगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. एक चतुरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक, नाट्य कलावंतच नाही, तर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com