युवा चेतना मंच तर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी

कामठी – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३२ व्या जयंती निमित्त स्वामी विवेकानंद वाचनालय रनाळा येथे झेन हाँस्पीटलचे संचालक डॉ आशिष वाजपेयी , रनाळा ग्रामपंचायत चे सरपंच पंकज साबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सपाटे, आमीर खान,कामठी अर्बन निधी बैंक चे संचालक नितीन ठाकरे , दिंव्याग बहुउदेशीय सामाजिक

संस्थेचे अध्यक्ष बाँबी महेंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून संविधानाचे सामुहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी ‘भारतीय लोकशाहीत संविधानाचे महत्त्व ‘ याविषयावर मधुकर गिरी सर यांनी मार्गदर्शन केले. अक्षय खोपे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रमुख प्रंसगावर प्रकाश टाकले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.पराग सपाटे प्रस्ताविक नम्रताताई अढाऊ तर आभार दिंव्याशु बोरकर यांनी केले. यांनी केले. याप्रसंगी गणेश सपाटे, विजय टाकभवरे, शेषराव अढाऊ , अमोल नागपूरे, नरेश सोरते, लक्ष्मीकांत अमृतकर रुचीता आष्ठणकर, खुशबु येवले, श्रुतीका मुर्रे , शीतल मेश्राम, कुणाल गजभिये, शिल्पा मस्के, रिया आगरकर ,हिंमाशु लोडेकर प्रामुख्याने उपस्थित होते .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक जागतिकस्तरावर सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल - राज्यपाल रमेश बैस

Fri Apr 14 , 2023
मुंबई : इंदू मिल दादर येथे तयार होणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक देशासाठीच नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. दादरस्थित चैत्यभूमी येथील आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com