मनपात ७ ऑगस्ट रोजी ‘लोकशाही दिन’

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या केंद्रीय कार्यालयात सोमवार ७ ऑगस्ट २०२३ रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार ‘लोकशाही दिन’ म्हणून आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार दिनांक ७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृह येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनानिमित्त संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारींसह आयोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोवाड बसस्थानक दर्ग्यातील दानपेटीवर मारला चोरट्यानी डल्ला

Fri Aug 4 , 2023
राजेंद्र बागडे,तालुका प्रतिनिधी       नरखेड :-  राममंदिराच्या चोरीच्या माध्यमातून मधात आलेली अडसर महिला हिचा खून करण्यात आलेला चोरट्याना पकडून पोलिसांना मात्र मोठे यश आले असले तरी मात्र चोरट्याचा थाम थांबला नाही.पंधरा दिवसाने ही चोरट्याची दुसरी घटना घडली. दि. 2 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या दरम्यान मोवाड बस स्थानक परिसरातील असलेला पहिलवान शहा बाबा दरबार मधील दानपेटी चोरट्यानी तोडून त्यामधील दान स्वरूपात आलेली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com