जगाला युद्ध नाही तर फक्त बुद्धाचे विचारच तारू शकतात – माजी जी. प. अध्यक्ष सुरेश भोयर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– रमानगर येथे बुद्ध जयंती हर्षोल्लाहासात,सामूहिक भोजनदान वितरित

कामठी :- कामठी येथील रमानगर स्थित कमलाबाई सोनडवले वाचनालय येथे वैशाख पोर्णिमा तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती हर्षोल्लाहासात साजरी करण्यात आली.याप्रसंगी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर व माजी नगरसेवक लालसिंग यादव यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची दीप,धूप ,पुष्पद्वारे पूजा करीत माल्यार्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

याप्रसंगी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी आपल्या मार्गदर्शनार्थ सांगितले की वैशाख पौर्णिमेला तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि वैशाख पोर्णिमेलाच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि वैशाख पोर्णिमेलाच त्यांचे महापरिनिर्वाण घडले. सुखी समृद्ध जीवनासाठी बुद्धाच्या तत्वज्ञानाची गरज असून सर्वांनी तथागत गौतम बुद्ध व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून या महामानवांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे तर जगाला युद्ध नाही तर फक्त बुद्धांचे विचारच तारू शकतात. असे मौलीक प्रतिपादन केले. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रमोद उर्फ दादा कांबळे, माजी नगरसेवक विकास रंगारी, माजी नगरसेवक लालसिंग यादव, दिपंकर गणवीर, आशिष मेश्राम,उदास बन्सोड, राजेश गजभिये, प्रमोद खोब्रागडे,राजन कांबळे,कोमल लेंढारे,अंकुश बांबोर्डे,विलास बन्सोड आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सामूहिक भोजनदान वितरणाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी हजारोच्या संख्येतील नागरिकांनी या भोजनदानाचा आस्वाद घेतला.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कमलाबाई सोनडवले वाचनालयाचे राजेश गजभिये, सिद्धार्थ बागडे,राजेंद्र मेंढे, सतीश गजभिये, तुषार गजभिये, राजेंद्र फुले ,अक्षय गजभिये,शुभम वासनिक,अनमोल लोणारे,राजू गजभिये,जॉनटी कांबळे,विभाशु कांबळे,तेजस गजभिये,अश्वजित लोणारे,दीपक बागडे,सोनू चवरे,पंकज वाघमारे,अजय वाघमारे,अनिल धमगाये,बप्पी वाळके,आनंद गजभिये तसेच अनिता गजभिये, रुकमाबाई वासनिक,सुशमा मेंढे,सविता गजभिये, पंचशीला गजभिये, अनिता वासनिक, जयश्री बागडे, बेबीनंदा वाघमारे, माया कांबळे,अलका पारसे, भूमिका लोणारे,संबोधी गजभिये, बॉबी वासनिक आदींनी मोलाचे परिश्रम केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कापसे तर सरचिटनिसपदी बावनकर यांची नियुक्ती

Sat May 6 , 2023
– व्हाईस ऑफ मिडीया संघटनेची ‘ रामटेक तालुका कार्यकारिणी ‘ चे गठन – सर्वानुमते झाली नियुक्ती रामटेक :- व्हाईस ऑफ मिडिया या चर्चित व राष्ट्रव्यापी संघटनेत रामटेक तालुक्यातील विविध वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी आवर्जुन सहभाग घेतलेला असुन संघटनेची रामटेक तालुका कार्यकारिणी नुकतीच स्थापन करण्यात आलेली आहे. दरम्यान याप्रसंगी रामटेक तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जनता टाईम्स चे विदर्भ ब्युरो चिफ राजु कापसे तर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com