तान्हा पोळ्याच्या माध्यमातून लहान मुलांना कृषी संस्कृतीची शिकवण दिली जाते – माजी नगरसेवक प्रतीक पडोळे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सन हा पोळा असून बैलपोळा व तान्हापोळा असा सन साजरा होण्याची महाराष्ट्रीयन संस्कृती अजूनही कायम आहे .तान्हापोळा हा बहुतेक लहान मुलाच्या विरंगुळ्यासाठी साजरा करण्याची प्रथा आहे लहान मुलं या दिवशी लाकडी, मातीच्या नंदीबैलाना सजवून घरोघरी जातात व त्यांना काही दक्षिना देत व तोंड गोड करीत स्वागत केले जाते मात्र या तान्हापोळ्याच्या माध्यमातून लहान मुलांना कृषी संस्कृतीची शिकवण देत असल्याचे मौलिक प्रतिपादन मुख्य अतिथी माजी नगरसेवक प्रतीक पडोळे यांनी शिवछत्रपती नगर येथे चंद्रशेखर डोनारकर द्वारा आयोजित तान्हा पोळा कार्यक्रमात व्यक्त केले.

तान्हापोळ्या निमित्त सहभागी समस्त बालकांनी विविध वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला. यावेळी सहभागी बालकांना गोड मिठाई,फळ,चॉकलेट,बक्षीस वितरण करीत सम्मान करून तान्हापोळा साजरा करण्यात आला.यावेळी दिनेश देवांगण क्रिश सातपुते ,पिंटू कांबळे, हर्षल रंधई या बालकांना तान्हा पोळ्या निमित्त बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात आले.

NewsToday24x7

Next Post

येरखेड़ा येथे तान्हा पोळा कार्यक्रम आयोजन

Mon Sep 18 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्व. नितिन रायबोले गुरूजी स्मृति प्रित्यर्थ भव्य तान्हा पोळा कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा भूषणनगर दादीमा किराणा स्टोर जवळ न्यू येरखेड़ा, कामठी येथे शनिवार दि 16 सप्टेबंर 2023 ला सांयकाळी 5 वाजता करण्यात आले. उत्कृष्ट वेशभूषा धारकांना प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस आणि सर्व सहभागी बालगोपालांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. कार्यक्रम अध्यक्ष ब्रह्मकुमारी […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com