सुधारित कार्यक्रम एकलव्य निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता इयत्ता 6 वी ते 9 वी साठी निवासी प्रवेशाबाबत

गडचिरोली : प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी, जि.गडचिरोली यांचे कार्यक्षेत्रा अंतर्गत अहेरी, मुलचेरा, सिरोंचा हे तीन तालुके येत असून सदर तालुक्यातील इयत्ता 6 वी, 7 वी, 8 वी, 9 वी मध्ये प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता एकलव्य रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश घेण्याबाबत इच्छुक पालकांनी विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी व शासकीय अनुदानित आदिवासी मुला / मुलींचे वसतिगृह येथून विनामुल्य अर्ज प्राप्त करुन दिनांक 31 जानेवारी 2023 पर्यत सादर करावे. इयत्ता 6 वी ते 9 प्रवेश मिळण्याकरिता अर्टी व शर्ती पुढील प्रमाणे आहे.

सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छीनारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. पालकांचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अनुसूचित जमातीच्या दाखल्याची सांक्षाकित प्रत सादर करावी. कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न 6 लक्ष इतके मर्यादित राहील. पालक दारिद्रय रेषेखाली असेल तर त्या संबधाचा दाखला जोडावा. शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये इयत्ता 5 वी तसेच 6 वी ते 8 वी चे वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे निवड स्पर्धा परिक्षेच्या माध्यामातून करण्यात येईल. व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यानांच प्रवेश देता येईल. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश कोणतेही वेळी रद्द करण्यात येईल.

निवड झालेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या व पाल्यांचा विनंती नुसार शाळा बदलता येणार नाही. याबाबत पालकांनी हमी पत्र सादर करावे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्यासाठी 5% जागा आरक्षित राहील. तसेच अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यासाठी 3% जागा आरक्षित राहील. असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी यांनी कळविले आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पांचपावली पुल पर गड्ढों का राज

Tue Jan 3 , 2023
नागपुर :- नागपुर को गड्ढों के शहर के रूप में पहचान मिल रही है। इनमें से प्रत्येक पांचपावली पुल पर हमारे पास आता है। यहां से गुजरने वाला हर मोटर चालक घोड़े की सवारी करने जैसा महसूस करता है। इस पुल के गड्ढे कुछ हद तक भर जाते हैं लेकिन कुछ ही दिनों में ये फिर से गड्ढों के रूप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com