सार्वजनिक ठिकाणी लागलेले अनधिकृत होर्डिंग, बॅनर नियमानुसार हटवावे

· नगरपालिका व नगर परिषदांचा जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी घेतला आढावा.

भंडारा : नगरपरिषदांनी आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत सर्व शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी. शहर विद्रूप करणारे अवैध होर्डिंग ,बॅनर फ्लेक्स हे तातडीने हटवण्यात यावे. तसेच अवैध अतिक्रमणावर ही नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी काल दिले. जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांचा आढावा घेताना ते बोलत होते. त्यावेळी नगरपालिका प्रशासन सहआयुक्त चंदन पाटील व सातही नगरपरिषदांचे मुख्य अधिकारी मुख्याधिकारी उपस्थित होते. रुजू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनाचा योजनांनीहाय आढावा घेतला.

स्थानिक क्षेत्रात नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था असून त्यांनी कर स्वरूपात मिळणारे निधी संकलन करावे म्हणजे त्या क्षेत्रातील विकासासाठी तो निधीB उपलब्ध होईल. 100% कर संकलनाचे उद्दिष्ट सर्व नगरपालकांनी ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले .नगरपालिका अंतर्गत महिला बचतगटांचे सक्षमीकरण करण्यासाठी ठोस प्रयत्न करण्यात यावे,तसेच मुख्याधिकार्यांच्या अडचणी त्यानी जाणून घेतल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

टेकाडी ग्रा प सदस्य सतिश घारड नी रक्तदान करून स्विकारला पदभार

Sat Jan 7 , 2023
सहकाऱ्यांनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन .   कन्हान :- ग्राम पंचायत टेकाडी (को.ख.) अंतर्गत प्रभाग क्र.२ मधुन युवा शक्ती ग्राम विकास पॅनलच्या सतीश घारड यांनी ९७२ मतां पैकी ४१८ मत घेऊन दणदणित विजय मिळवला. अपक्ष पद्धतीने लढलेल्या या उमेदवाराच्या सहकार्यांनी पदभार स्विकारण्या आधी रक्तदान करण्याचा संकल्प करून तोही यशस्विकरून दाखविल्याने गावात सध्या या अनोख्या संकल्प नेची चांगलीच चर्चा आहे. गुरूवार (दि.५) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com