फसवणूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

पो.स्टे. उमरेड :- अंतर्गत ०२ कि.मी. अंतरावरील मौजा बुधवारीपेठ उमरेड सरकारी दवाखान्यासमोर दिनांक ०१/०६/२०२३ चे ११.०० वा. ते दिनांक ०८/०६/२०२३ से १२.०० वा. दरम्यान फिर्यादी नामे- पंकज चंद्रभान भुरसे, वय २३ वर्ष, रा. बुधवारीपेठ उमरेड यांचे मामे भाऊ नामे तुषार नवघरे यांचा ग्रामिण रूग्णालय उमरेडचे समोर पानठेला असुन तो दुकान सांभाळतो. दि. ०१/०६/२०२३ रोजी ११.०० वा. फिर्यादी हा (पानठेला) दुकानात जावुन बसले असता एक व्यक्ती हा दुकानात आला व म्हणाला की मला लग्नाला जायचे आहे व माझे भावाची तबीयत खराब आहे त्यामुळे मला पैशाची आवश्यकता आहे माझे कडे पैसे नाही माझी गरज भागवा असे म्हणुन त्याने त्याचे जवळील OPPO MODAL A77 SSG नविन ब्लु फेम रंगाचा मोबाईल दाखविला ज्याची सध्या मार्केट किंमत १८०००/- रु आहे असे सांगुन तो मोबाईल १५०००/- रूपयात विकायचे आहे व मोबाईलचे बिल दाखविले तो मोबाईल ११०००/- रु. विकत घेते वेळी फिर्यादीने त्या व्यक्तीचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव प्रकाश वामन पवार, रा. मैडेपठार ता. काटोल जि. नागपुर असे सांगुन रू ११०००/- घेवुन निघुन गेला. फिर्यादीने विकत घेतलेला मोबाईल चेक करून सिम टाकले असता मोबाईल मध्ये सिम लागत नव्हते तेव्हा फिर्यादीने मोबाईल उमरेड येथील मोबाईल वर्ल्ड या दुकानात दाखविले असता त्याने हा मोबाईल डमी पिस आहे. हा मोबाईल फक्त ग्राहकांना सॅम्पल म्हणुन दाखविण्याकरीता कंपनी पुरवित असते. दि. ०८/६/२०२३ रोजी १२.०० वा फिर्यादी हा तुषार नवघरे यांचे दुकानात असता तुषार नवघरे यांनी फिर्यादीस एक इसम सत्यम हॉल समोरील पाणठेले वाला मौसम खोब्रागडे यास एक इसम मोबाईल विकण्यास आला आहे असे सांगितले यावरून फिर्यादी तेथे गेले असता प्रकाश पवार हा तेथे मिळून आला तेव्हा प्रकाश पवार याने मौसम खोब्रागडे याला सुध्दा त्याचे डमी मोबाईल २० विकला होता. यातील फिर्यादीला नमुद आरोपी नामे प्रकाश पवार यांनी OPPO MODAL A मोबाईल पिस दाखवुन खरा मोबाईल असल्याचे सांगुन फिर्यादीची ११०००/- ची फसवणुक केली सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. उमरेड येथे आरोपीविरुद्ध कलम ४२० भादवि. नोंद केला आहे. आरोपीला अटक केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश गिरडकर हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

NEW ENROLMENT IN AIR WING NCC – 2023

Sat Jun 10 , 2023
Nagpur :-1. No 2 (Mah) Air Sqn NCC, Nagpur begins enrollment of students of BA /B Com / B Sc (Ist year), BE/B Tech (II year) and any five-year integrated course (II & III year) for a three-year NCC training programme for student studying in any college affiliated to Nagpur University, located within corporation limits of Nagpur city. 2. The […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com