मोबाईल शॉपी दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- नरेश प्राणनाथ भयो वय ५२ वर्ष रा. ए ७, पार्क व्हिव अपार्टमेंट, कस्तुरचंद पार्क समोर, नागपुर यांचे पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत टेलीफोन एक्सचेंज चौक, नागपुर येथे काव्या मोबाईल शॉपी नावाचे दुकान असून फिर्यादी रात्री दुकान बंद करून घरी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे दुकानाचे शटर्सचे लॉक तोडुन, दुकानात प्रवेश करून दुकानातील विविध कंपनीचे २१ मोबाईल व २३ स्मार्ट वॉच असा एकुण किंमत अंदाजे २,३५,०९६/- रु. या मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पो, ठाणे लकडगंज येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ४५४, ४५७, ३८० भादवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क्र. ३ चे अधिकारी व कर्मचारी यांना मिळालेले खात्रीशीर माहीतीवरून तसेच तांत्रीक तपास करून गुन्हयातील आरोपी मोहम्मद अरशीद उर्फ अरशद साजीद शेख वय १९ वर्ष रा. मोठा ताजबाग, यासीन प्लॉट, सक्करदरा, नागपुर यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता आरोपीने सदर गुन्हा हा त्यांचे दोन विधी संघर्षग्रस्त साथीदारासोबत केल्याची कबुली दिली. आरोपीस नमूद गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्याचे ताब्यातून गुन्हयात चोरी गेलेले मोबाईल जप्त करण्यात आले आहे. आरोपीस मुद्देमालासह लकडगंज पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.

वरील कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. मुकंद ठाकरे, सपोनि समाधान बळवजकर, पोउपनि मधुकर काटोके, बलराम झाड़ोकर, सकौ, सतिष पांडे, दशरथ मिश्रा, विजय श्रीवास, संतोष ठाकुर,पोअ जितेश रेड्डी, दिपक दसरवार, विशाल रोकडे, प्रमोद देशभ्रतार, दिपक लाखडे, यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तोतयेगिरी करून फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Fri Oct 20 , 2023
नागपूर :- पोलीस ठाणे बजाजनगर हद्दीत पि अँड टी कॉलनी, प्लॉ. नं. ८७, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी निरुपमा नरेंद्र सिंग वय ७० वर्ष हया हळदी कुंकवाचे कार्यक्रमाकरीता पायदळ घराजवळ जात असता नं. ८५ चांद्रायण यांचे घरासमोर फिर्यादी यांना एका इसमाने थांबवुन स्वतःला पोलीस असल्याची बतावणी करून तुम्हाला आमचे साहेब बोलावित आहे असे म्हणून बाजुला असलेल्या तोतया साथीदाराकडे घेवुन गेला. आरोपींनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com