प्लास्टिकच्या विरोधात मनपाची धडक कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.16) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 3 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच नायलॉन मांजाच्या विरोधात 100 आस्थापनेची तपासणी करण्यात आली.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत टिमकी, मोमिनपुरा येथील आदित्य सोनपापडी यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत प्रेम नगर, नारायणपेठ येथील मोहित सोनपापडी यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

 त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत प्रभाग न.17, पटेल चौक, घाट रोड येथील मारोती कार्नर सर्व्हिस यांच्याविरुध्द कार्यालयातील कचरा रस्त्यालगत फुटपाथवर टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत प्रभाग न.17, तुलसीबाग येथील M/s Foot Right India Pvt.Ltd यांच्याविरुध्द दुकानातील कचरा तुळशीबाग येथील डंप यार्डमध्ये टाकल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच आशीनगर झोन अंतर्गत प्रभाग न. 02, रमाई नगर येथील प्रमिला जांभुळकर यांच्याविरुध्द रस्त्यालगत टाकाऊ अन्न/जेवण टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Mumbai Police has violates the SC & Govt decisions, the plight of the homeless in Mumbai

Tue Jan 17 , 2023
Mumbai :-Despite the Maharashtra government’s decision not to take action against the homeless in winter and the Supreme Court’s order to build 125 night shelters in Mumbai, the Mumbai police system is violating the orders by doing innovative plight to the homeless. Complaining to the Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Police Commissioner, RTI activist Anil Galgali has demanded that […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com