अमर गारमेंटस् नव्हे हा तर ‘ब्रॅंड मराठा ‘! अण्णासाहेब पाटील योजनेतून भरारी

नागपूर :- भरारी घेणाऱ्या पंखांना संधी आणि प्रोत्साहनाची गरज असते. नागपूरच्या रामेश्वरी भागातील ‘अमर रेडिमेट गारमेंट्स अँड एम्ब्रोडरी वर्कचे’, मालक अमर प्रकाश आगलावे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मदतीतून आदर्श उभा केला आहे. मराठा समाजातील युवकांसाठी अमर आता नवे प्रेरणास्त्रोत झाला आहे.

सुशिक्षित बेरोजगार असणाऱ्या अमरने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. मात्र प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणार नाही हे मनात असल्यामुळे त्याने आपल्या कौशल्यालाच आपला व्यवसाय केले आहे. अमरची ख्याती आहे त्याच्याकडून शिवलेला पेहराव तुमच्या व्यक्तिमत्वात चार चाँद लावतो. अमरचे मित्र म्हणतात की लग्नात बोहल्यावर उभे राहायचे असेल तर कपडे अमरनेच डिझाईन केले असावे.

शर्ट पॅन्ट सोबतच कुर्ता पायजमा व त्यावरची एम्ब्रॉयडरी कलाकुसर अमरचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. अमरने स्वतःच्या व्यवसायातून चार ते पाच कारागिरांना देखील व्यवसाय दिला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून केवळ पाच लाखाचे कर्ज घेऊन त्याने आपल्या व्यवसायाला बरकत आणली आहे. रेडीमेड कपडे, खुले शर्ट – पॅन्ट कपडे, व्यवसायासोबतच शहरातील नामांकित ब्रँडच्या दुकानांना रेडिमेट कपडे पुरवठा करण्याचे कसबही त्याने मिळवले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासारखे मंडळ ही मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार लोकांसाठी संधी असल्याचे त्याचे म्हणणे आहे. मराठा समाजातील युवक कल्पक, जिद्दी, आणि लढवय्ये असतात. त्यामुळे व्यवसायात हे गुण टाकले तर यश निश्चित मिळते असे त्याचे म्हणणे आहे.

युवकांनी कौशल्ययुक्त होऊन योग्य व्यवसायाची निवड केली तर सहजच शासनाच्या श्रेणी एक व श्रेणी दोनच्या अधिकाऱ्याचा पगार कमावणे शक्य असल्याचा दावा त्याने केला आहे.

कसे मिळवायचे कर्ज ?

मराठा समाजातील व्यक्तींना किंवा व्यक्तींच्या गटांना दोन योजनेतून कर्ज मिळवण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे. एक कर्ज मर्यादा १५ लाखाची तर दुसरी कर्ज मर्यादा ५० लाखापर्यतची. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे कर्जावरील रकमेचे १२ टक्के पर्यंत व्याज शासन भरणार आहे.

कोणती कागदपत्रे हवी ?

कर्ज मिळवण्यासाठी पात्रता कागदपत्रे आवश्यक आहे.यामध्ये स्वतःच्या ईमेल आयडीसह मोबाईल क्रमांक अपडेट असणारे आधार कार्ड, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, एक पानी प्रकल्प अहवाल आवश्यक आहे. या योजने संदर्भातील सर्व माहिती देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.

कुठे आहे कार्यालय ?

सिव्हिल लाईन परिसरातील प्रशासकीय भवन क्रमांक २ मध्ये दुसऱ्या मळ्यावर कौशल्य विकास विभागामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कार्यालय आहे.

नागपूर जिल्ह्यासाठी कौशल्य विकास विभागात ०७१२-२५३१२१३ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती मिळवता येईल. नागपूर जिल्ह्यासाठी श्रीमती प्रियंका कपले या समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

मराठा समाजातील युवकांना उद्योजक करण्यासाठी या महामंडळामार्फत विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये

१. )१५ लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ( आयआर -१ )

२.) २५ लाखांवरील ( महत्तम ५० लाख ) गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना या दोन प्रमुख योजनांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ घेण्याच्या आवाहनही अमरने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी नगर विकास कृती समितीचे भीक मांगो लोटांगण आंदोलन

Fri Sep 22 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी शहर विकासात्मक दृष्टिकोनातून अजूनही मागासलेले आहे .तेव्हा कामठी शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी कामठी नगर विकास कृती समितीच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. याअंतर्गत अर्धनग्न आंदोलन करण्यात आल्यानंतर आज 22 सप्टेंबर ला भर पावसात लोटांगण घालत भीक मांगो आंदोलन करण्यात आले. या भीक मांगो आंदोलनात सुगत रामटेके, उमेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com