महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा आज जिल्ह्यात स्टार्ट

भंडारा : 15 ऑगस्टपासून सुरू झालेली महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा उद्या 20 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात येत आहे.

            भंडारा जिल्ह्यातील मोहाडी व तुमसर तालुका येथे पोहचत आहे. या स्टार्टअप यात्रेचा थांबा हा सकाळी 9 ते 11 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहाडी, सकाळी 11 ते 12 वाजता नटवरलाल पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय, मोहाडी, दुपारी 2 ते 3.30 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर, दुपारी 3.30 ते 4.30 वाजता महिला महाविद्यालय, तुमसर, दुपारी 4.30 ते 5.30 वाजता मायनिंग आयटीआय तुमसर येथे असणार आहे. तरी परिसरातील व तालुक्यातील विद्यार्थी, नवउद्योजक व सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की सदर यात्रेमध्ये सहभागी होवून यात्रेची परिपूर्ण माहिती घ्यावी व आपल्याकडील नवसंकल्पनांना चालना देत महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बालकांच्या नियमित लसीकरणाबाबत समाजात जनजागृती आवश्यक आरोग्य विभागातर्फे लसीकरण सुक्ष्मकृती आराखडा प्रशिक्षण

Sat Aug 20 , 2022
नागपूर : लस ही अर्भके, मुले आणि गर्भवती महिलांना रोग आणि मृत्यूपासून वाचवण्यासाठी सर्वात प्रभावी, परवडणाऱ्या आणि सुरक्षित पद्धतींपैकी एक आहे. संपूर्ण लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशाने, नियमित लसीकरणाबाबत समाजात अधिकाधिक जनजागृती पसरविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहीरवार यांनी केले. नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाअंतर्गत शुक्रवारी (ता.१९) रघुजीराजे भोसले नगर भवन, महाल येथे लसीकरण सुक्ष्मकृती आराखडा प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी आरसीएच अधिकारी डॉ. सरला लाड, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!