
वरोरा : नाट्य कलावंतांना त्यांची कला सादर करण्यासाठी वरोरा शहरात सुसज्ज रंगमंच व्हावा, असे प्रतिपादन किशोर टोंगे यांनी केले.
कला छंद प्रतिष्ठानच्या वतीने वरोरा शहरात आयोजित सून सांभाळा पाटलीन बाई या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे उदघाटन युवा नेते किशोर टोंगे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.

वरोरा शहराची जिल्ह्यात एक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे मात्र शहरात सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी एक सुसज्ज सभागृह किंवा रंगमंच उपलब्ध नाही असे ते म्हणाले यासाठी ते शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

पूर्व विदर्भात असलेली झाडीपट्टी नाट्य चळवळ ही अत्यंत दर्जेदार कलावंत व संहिता असेलली चळवळ असून तिला मुख्य प्रवाहात स्थान मिळणे गरजेचे आहे. तसेच यात कामं करणाऱ्या कलावंतांना चांगले मानधन आणि इतर सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.
वरोरा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत चांगलं आणि दर्जेदार नाटक आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी उदघाटन सोहळ्यास माजी विधानसभा उपाध्यक्ष दिवंगत मोरेश्वर टेमुर्डे, शिवसेनेचे रवींद्र शिंदे व दत्ता बोरेकर उपस्थित होते.