भरमसाठ वीज देयक आले, आपणच आपले देयक तपासा…

नागपूर :- काही दिवसांपासून नागपूरसह राज्यात सर्वत्र उन्हाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे सहाजिकच पंखा, रेफ्रीजरेटर, एअर कंडिशनर यांचा वापरही दिवसेंदिवस वाढत आहे. या उपकरणांच्या वीजवापराच्या प्रमाणातच आपल्याला वीजबिल आले आहे की नाही ही शंका उपस्थित होते व याची चाचपणी केली जाते. यात विजेचा वापर कमी व आवश्यक असेल तेवढाच केल्यास वीजबिलात बचत होणे शक्य आहे तर वीजवापराच्या प्रमाणात वीजबिल आल्याची खात्रीही करता येते.

प्रत्येक घरी विद्युत उपकरणांची यादी वाढतच आहे व वाढतच जाणार आहे. त्यात रोज नवनवीन विद्युत उपकरणाची भर पडत आहे. मात्र ही उपकरणे वाढली व त्याचा वापर वाढला की, विजेचे बिलही वाढणार आहे. मात्र आपल्या हातात एप्रिल, मे, जून व जुलै महिन्याचे वीज देयक आले की, अनेकांच्या भुवया उंचावतात. माझा वापर एवढा नसताना बिल भरमसाठ आल्याचे त्यांना वाटत असते. एखाद्या प्रकरणात कर्मचाऱ्याच्या दोषामुळे, चुकीच्या मीटर वाचनामुळे किवा मीटरमधील तांत्रिक दोषामुळे हे होऊ शकते. त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये, दुकान व इतर ठिकाणी असलेली विजेची उपकरणे त्याचा वॅट व त्याचा दैनंदिन वापर याची जर माहिती करून घेतली व अभ्यास केला तर आपल्यालाही सत्यता पडताळता येईल. त्यासाठी वीज देयक जाणून घेण्यासाठी अनेक संकेतस्थळे व अॅप आहेत त्यावर जाऊन आपण आपल्या घरात असणारी उपकरणे, त्याचा असलेला वॅट व संख्या, आणि उपकरणाचा दिवसातील वापराचे तास ही माहिती टाकल्यास आपला महिन्याला होणारा एकूण युनिट वापर व वीजबिलाची अंदाजित रक्कम याची माहिती आपण प्राप्त करू शकता.

वीजबिलाच्या मागे असलेल्या वर्गवारीनिहाय वीज देयकाचे प्रति युनिट दर दिलेले असतात त्यामध्ये 0 ते 100, 101१ ते 300 व 301 ते 500 व 501१ ते 1000 व 1001 आणि अधिक युनिट वीजवापरासंदर्भातील दर छापलेले असतात. त्यामुळे एखाद्या महिन्यात जास्त वीज युनिट वापरल्यास त्याचे दरही त्या तुलनेत वाढत असतात. घरात विजेचा वापर करताना आयएसआय प्रमाणित तारांचा तसेच ऊर्जा बचतीचे प्रमाणपत्र लाभलेल्या व स्टार लेबल असलेल्या उपकरणांचा वापर करावा, जेवढे जास्त स्टार तेवढी जास्त ऊर्जा बचत होते. आपल्याला उपकरणांचे वॅट, त्याचा दैनंदिन वापर याची माहिती झाल्यास वीज बिलाचे नियोजन करण्यासाठी विजेच्या वापरावर लक्ष ठेवून वीज बिल कमी करता येईल व आलेले वीज बिल एवढे का, याचा उलगडा नक्कीच होईल. 1000 वॅटचे उपकरणाचा जर एक तास वापर केला तर 1 युनिट साधारणतः वीज खर्च होते, त्यामुळे एकूण विजेचे वॅट व 1 युनिट विजेसाठी लागणारा वेळ यासंदभार्तील तक्ता सोबत दिला आहे. त्यामुळे या सर्व बाबींची माहिती घेतल्यास व स्वतःच याचे आडिट केल्यास वीजबचतीसोबतच वीजबिल नियंत्रित करणे सोपे होईल व वापरलेल्या विजेचे बिल भरताना त्रासही होणार नाही.

वीज वापराबाबतचा तक्ता

प्रकार वीज वापर (वॅट्स) एक युनिट विजेसाठी लागणारा वेळ

बल्ब २४/४०/६०/१०० ४०/२५/१६/१० तास

पंखा- ३६ इंच ६० १६ तास ४० मिनीट

पंखा- ४२ इंची ८० १२ तास ३० मिनीट

टेबल फॅन ४० २५ तास

मिक्सर, ज्युसर ४५० २ तास १३ मिनीट

इलेक्ट्रीक ओव्हन १२०० ५० मिनीट

इस्त्री – कमी वजन १००० ६० मिनीट

इस्त्री जास्त वजन २००० ३० मिनिट

टीव्ही १५ ६६ तास ४० मिनिट

वॉशिंग मशीन स्वयंचलित २००० ३० मिनीट

सेमी स्वयंचलित ४०० २ तास ३० मिनीट

व्हॅक्यूम क्लिनर ९५० १ तास

संगणक २५० ४ तास

वॉटर प्युरिफायर २५ ४० दिवस

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, 

महावितरण, नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रदेश भाजपा कार्यालयात स्थापना दिन साजरा

Sat Apr 6 , 2024
मुंबई :- भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी प्रदेश भाजपा कार्यालयात भाजपाचे ज्येष्ठ नेते व उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल पद्म भूषण राम नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, सह सचिव भरत राऊत आदी उपस्थित होते. यावेळी राम नाईक म्हणाले की आज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com