पारशिवनी वनपरिक्षेत्राच्या वनकर्मचा – याच्या साहायाने बिबटयाला विष बाधा झाल्याने बिबटयाला जाळे टाकून पकडण्यात आले.

त्यानंतर त्याला जेरबंद करून टि.टि.सी सेंटर नागपूर येथे पुढील उपचाराकरिता नेण्यात आले

पारशिवनी:- दि 29.12.2022 गुरुवार रोजी पारशिवनी वनपरिक्षेत्रातील मौजा करंभाड मधील भागीमहारी रोड येथिल  रामकृष्ण धोडे यांचे शेत सर्व्हे के 88 येथे सकाळी विवट दिसल्याची बातमी मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी शालिनी शिरपुरकर पारशिवनी पुर्ण वनकर्मचायासह घटना स्थळी करं भाड येथिल भागीमहारी रोड जवळ रामकृष्णा धोडे याचे शेतात पोहोचले . सदर स्थळाची मौका पाहणी करून प्रथम दर्शनी बिबटयाला विष बाधा झाल्याची शक्यता असल्याचे दिसून आल्यामुळे याबाबत टी.टी.सी नागपुर व रेस्क्यु सेंटर नागपूर यांना माहिती देवून तात्काळ मौका स्थळी बोलावण्यात आले . रेक्यु सेंटर नागपूर व टी.टी.सी नागपूर यांची टिम मौका स्थळी करंभाड ते भागीमहारी रोडवर पोहोचल्यानंतर सदर टिमसह पारशिवनी वनपरिक्षेत्राच्या वनकर्मचा – याच्या साहायाने बिबटयाला जाळे टाकून पकडण्यात अंदाजे आज दुपारी 1.30 वाजता वनविभागाला यश आले . त्यानंतर त्याला जेरबंद करून टि.टि.सी सेंटर नागपूर येथे पुढील उपचाराकरिता नेण्यात आले सदर बिबट मादी असून अंदाजे वय 3 ते 4 चार वर्ष आहे . तसेच प्रथम दर्शनी बिबटयाला विषबाधा झाले असल्याचे शक्यता नाकारता येत नाही . सदरची कार्यवाही नागपूरचे  उपवनसंरक्षक डॉ भारतसिंग हाडा यांचे मार्गदर्शनाखाली  शालीनी शिरपूरकर वनपरिक्षेत्र अधिकारी पारशिवनी , अनिल भगत वनपरिक्षेत्र अधिकारी रामटेक , एच . एम . वाढई क्षेत्र सहा पारशिवनी तसेच  टी.ए. रामटेके वनपरिक्षेत्र अधिकारी रेस्क्यू सेंटर ए . एच . खडसे वनपाल रेस्क्यू सेंटर नागपूर ,  . डॉ . सुदर्शन काकडे व त्यांचे सहकारी  डॉ पंकज थोरात टी.टी. सी नागपूर ,  राहुल सोनवाने पोलिस निरिक्षक पारशिवनी ,  रणजीत दुसावार नायब तहसिदार पारशिवनी यांचे सहाकार्याने करण्यात आले .

गावकऱ्या व्दारे माहीती मिळाली की हा बिट्याने मागील तिन दिवासा पासुन अमित शेषराव धोडें , जयराम धुडे याचे दोन कुत्रे, एक कारवळ, आणी एक बकरी ची शिकार केली आहे .

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com