कामठी तालुक्यातील अवैध विटभट्टयात बालकामगार कायद्याचे सर्रास उल्लंघन

संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 30:- कामठी तालुक्यातील ग्रीन बेल्ट येणाऱ्या खैरी,खसाळा-म्हसाळा,कवठा, वारेगाव, सुरादेवी यासह कवठा, शिरपूर, पावंनगाव यासारख्या इतर गावात मोठ्या प्रमाणात विना परवाना विटभट्ट्यांचा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असून या विटभट्टांच्या धुरामुळे लगतच्या असलेल्या शेतकऱ्यांचे शेतपिकाचे सर्रास नुकसान होत असून या शेतकऱ्यांचे एकूण 100 टक्के होणारे उत्पन्न एकदम 30 टक्के वर येऊन पोहोचल्याने एकीकडे निसर्गाचा फटका तर दुसरीकडे जमीनिवरील जिवंत माणसाच्या मनमानीचा फटका बसत आहे तसेच या विटभट्ट्यावर बेकायदेशीर पद्धतिने काम सुरू असून बाल कामगार कायद्याचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. या वीट भट्ट्यावर बाल कामगार सुद्धा काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे तर मागिल वर्षात शिरपूर येथील वीटभट्ट्यात काम करणाऱ्या मजुराच्या अल्पवयीन मुलीचा दुर्दुवी मृत्यू झाला होता तरी प्रशासन याबाबतीत कुठलीही गंभीर्याची भूमिका घेत नसल्याने शासनाच्या महसूल तिजोरीला फटका पडत आहे तसेच या वीट भट्ट्यावर काम करणाऱ्या व्यवस्थापकीय मंडळाला प्रशासनाचे कुठलीही भितो दिसून येत नाही तेव्हा या वीट भट्ट्यावर अजून किती जीवाचा बळी देण्यात येणार?असा सवाल ही येथील जागरूक मंडळी करीत आहे.
तसेच शेती पिकाला बसत असलेला फटका यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कुठलाही मार्ग निघत नसल्याने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कपाळावर हात ठेवून दाद मागायची कुठे ?अशी विचारणा करीत आहेत .मात्र या प्रकारामुळे प्रशासनाच्या कोट्यवधींचा महसूल पाण्यात बुडत आहे तर हा प्रकार येथील महसूल प्रशासन तसेच राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे बोलले जाते. एकीकडे या परिसरात शेती करीत असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनाची पुरेशी तशी सोय मिळत नाही तर दररोज हजारो लिटर पाण्याचा वापर हा अवैध वीटभट्ट्यासाठी केला जातो.

महसूल विभागाकडून बोटावर मोजण्याइतक्याच कंत्राटदारांना विटा बनविण्याचा परवाना देण्यात आल्याचे विश्वसनीय माहिती आहे .परवाने प्राप्त वीटभट्टी कंत्राटदारांना 1 ब्रास मातीपासून 1 हजार 500 विटा बनविण्याचा परवाना आहे मात्र या विटा भटयीच्या मालकाकडून 1 ब्रास मातीचा परवाना घेऊन 1 हजार 500 विटांच्या जागी तबबल दुप्पट विटा विकल्या जात आहेत .एकाच ट्रेकटर चा वारंवार परवाना घेऊन जवळपास 10 ब्रास विटांचा वापर होत आहे .या तेजीच्या व्यवसायात वीटभट्टी मालक गलेलठ्ठ होत आहेत तर या व्यवसायात काम करणारे मजूर अजूनही गरिबीचे जिने जगत आहे. वीटभट्टी मालकाकडून जवळपासच्या मजुरांना अग्रीम स्वरूपात पैसे देऊन त्या मजुराकडून कमी दरात अधिक कामे करवून घेत आहेत त्याचप्रमाणे या विटभट्ट्यावर बालमजुरांचा सुद्धा समावेश आहे या बाल मजुरांना आळा घालण्याचा कांगावा शासनाकडून वारंवार केल्या जात आहे मात्र वीटभट्टी व्यवसायाकडे बघितल्यावर शासन प्रशासन बालमजूर प्रतीचे धोरण पूर्णता खोटे असल्याचे दिसून येते .या विटभट्ट्यात कच्या विटा तयार करून भट्टी लावली जाते .ही वीटभट्टी लावताना त्याचा परवाना उपविभागोय अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयाकडून घेतले जाते .वीटभट्टी मालकाकडुन अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे .कोंड्यासाठी लाकडे जाळणे,कचचा कोळसा बनविणे यासाठी अवैध वृक्षतोड सर्रासपणे सुरू आहे .या विटभट्टीच्या लागतच असल्यामुळे वीटभट्टी धुरामुळे नजीकच्या शेती पिकावर फटका बसून शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत तसेच गावाचे वातावरण सुद्धा प्रदूषित होत आहे या सर्व बाबीवर नोयंत्रण म्हणून वीटभट्टी धारकांना आरोग्य विभागाची परवानगी घेणे हे बंधनकारक आहे परंतु या वीटभट्टी व्यावसायिकांनी हे सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत तसेच कच्या विटा तयार करन्यासाठी माती आवश्यक असते यासाठी वीटभट्टी व्यावसायिक मोठमोठे खड्डे खोदून त्यातून माती काढत असतात व या खड्ड्यातून डासांची उत्तपतती होत असते हे खड्डेच डासांचे उगमस्थान ठरत आहेत तसेच विटा भटटयाची निरुपयोगी राख हे नजीकच्या कालव्यात तसेच नदी नाल्यात टाकल्या जात असल्याने तेथील पाणी प्रदूषित होत आहे मात्र याकडे पर्यावरण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे . यासंदर्भात प्रशासन झोपेचे सोंग घेऊन असल्याने इथे’ऑल इज नॉट वेल’अशी स्थिती निर्माण झाली आहे.

-कामठी तालुक्यातील ग्रीन बेल्ट मध्ये मोडणाऱ्या सुरादेवी, वारेगाव,खैरी, खसाळा-म्हसळा , या गावातील 50 टक्के शेतकऱ्यांनि गरजेपोटी 1 लक्ष रुपये भावाने शेती वहिवाटी पद्धतीने नागपूरच्या काहो गर्भश्रीमंतांना दिली त्यांनी या ग्रीन बेल्ट मध्ये असलेल्या जागेत शेती न करता बिनधास्त पने महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाणे विटाभटयाचा व्यवसाय ठाकला आहे याचप्रकारे मागच्या दोन वर्षीपूर्वी शिरपूर येथील एका विटभट्ट्यात एका चार वर्षीय बालिकेचा डबक्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती हे इथं विशेष…तेव्हा या अवैध वीटभट्ट्यावर प्रशासनिक कंबर कसने अधिक गरजेचे आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

दोन दुचाकी चोरट्याना चोरीच्या दुचाकीसह अटक

Sat Apr 30 , 2022
संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 30:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी बस स्टँड चौकातील लस्सी च्या दुकानात दुचाकी ने लस्सी प्यायला आलेल्या ग्राहकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 26 एप्रिल ला सकाळी 11 दरम्यान घडली असता यासंदर्भात फिर्यादी सुनील बिंजाळे वय 40 वर्षे रा अंगुलीमाल नगर , नागपूर ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com