संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 30:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी बस स्टँड चौकातील लस्सी च्या दुकानात दुचाकी ने लस्सी प्यायला आलेल्या ग्राहकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 26 एप्रिल ला सकाळी 11 दरम्यान घडली असता यासंदर्भात फिर्यादी सुनील बिंजाळे वय 40 वर्षे रा अंगुलीमाल नगर , नागपूर ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा नोंदवून तपासाला गती दिले असता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित लिहिगाव ओव्हर ब्रिज जवळ पोहोचले असता या दुचाकी चोरट्याना ताब्यात घेत त्यांच्याकडील चोरीची असलेली काळ्या रंगाची पॅशन प्रो क्र एम एच 49 ए 9915 किमती 40 हजार रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.तर अटक दोन्ही चोरट्याचे नावे अक्षय जाधव वय 24 वर्षे , विजय जाधव वय 45 वर्षे दोन्ही राहणार हिवरा तांडा ता आर्वी जील्हा वर्धा असे आहे.
ही यशस्वी कारवाही पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, संदीप सगणे, संदेश शुक्ला,सुरेंद्र शेंडे, कमल कनोजिया, अनिकेत सांगळे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.