वेतनपट आकडेवारी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निव्वळ सदस्य संख्येत जानेवारी 2024 या महिन्यात 16.02 लाख सदस्यांची वाढ

– जानेवारी महिन्यात 8.08 लाख नव्या सदस्यांची ईपीएफओमध्ये नोंदणी

नवी दिल्ली :- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ मधील सदस्यांची तात्पुरती वेतन पट आकडेवारी आज म्हणजेच 24 मार्च 2024 रोजी जाहीर करण्यात आली. जानेवारी 2024 मध्ये, ईपीएफओ मध्ये 16.02 लाख सदस्य झाल्याचे, या आकडेवारीत अधोरेखित करण्यात आले आहे.

जानेवारी महिन्यात, सुमारे 8.08 लाख नव्या सदस्यांची नोंदणी झाली असल्याचेही या आकडेवारीत निर्दशनात आले आहे. या आकडेवारीतील आणखी एक लक्षणीय गोष्ट म्हणजे, त्यात 18 ते 25 या वयोगटातील तरुणांची संख्या अधिक आहे, जानेवारी महिन्यात नव्याने नोंदणी केलेल्या एकूण सदस्यांमधे 56.41% संख्या या तरुणांची आहे. ज्यावरून, संघटित क्षेत्रात रोजगार मिळवणारे, बहुतांश सदस्य युवा आहेत, त्यातील बहुतेक पहिल्यांदाच नोकरी मिळवलेले आहेत, असेही निदर्शनास आले आहे.

सुमारे 12.17 लाख सदस्य ईपीएफओमधून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा ईपीएफओमध्ये नोंदणी केली आहे. याचा अर्थ, या सदस्यांनी त्यांची नोकरी बदलली आणि त्यानंतर, ईपीएफओच्या कक्षेत येणाऱ्या आस्थापनांमध्ये पुन्हा रुजू झाले. शिवाय भविष्य निर्वाह खाते बंद करण्यासाठी अर्ज करण्याऐवजी त्यांची जमा रक्कम दुसऱ्या कंपनीत हस्तांतरित करण्याचा पर्याय निवडत त्यांनी , दीर्घकालीन आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेचा विचार केला.

वेतनपट आकडेवारीच्या स्त्री-पुरुषनिहाय विश्लेषणातून असे दिसून आले आहे की 8.08 लाख नवीन सदस्यांपैकी सुमारे 2.05 लाख महिला सदस्य आहेत. तसेच, या महिन्यात एकूण महिला सदस्यांची संख्या सुमारे 3.03 लाख इतकी होती. महिला सदस्यांच्या संख्येत झालेली वाढ, ही श्रमशक्ती अधिक सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण झाल्याचे लक्षण आहे.

उद्योगनिहाय आकडेवारीची मासिक तुलनात्मक आकडेवारी, संगणक वापर, रुग्णालये अशा तसेच उत्पादन आणि विपणन सेवा क्षेत्रातील कंपन्या, वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था इत्यादी उद्योगांमध्ये गुंतलेल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सदस्यांची वाढ दर्शवते. एकूण निव्वळ सदस्यत्वापैकी सुमारे 40.71% वाढ ही तज्ज्ञ सेवा क्षेत्रांमधली आहे. (यात, मनुष्यबळ पुरवठादार, कंत्राटदार, सुरक्षा सेवा, इतर कामे इत्यादींचा समावेश आहे.)

ही वेतनपट आकडेवारी तात्पुरत्या स्वरूपाची आहे, कारण आकडेवारी संकलन, ही सतत्याने सुरू असलेली प्रक्रिया आहे. कर्मचारी नोंदणी सतत सुरू असल्याने, या आकडेवारीत बदल होत असतो. त्यामुळे आधीची आकडेवारी दर महिन्यात अद्ययावत होत असते. एप्रिल 2018 पासून ईपीएफओ, सप्टेंबर 2017 नंतरच्या कालावधीसाठी वेतनपट आकडेवारी जाहीर करत आहे. मासिक पेरोल डेटामध्ये, आधार प्रमाणित युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) च्या माध्यमातून, प्रथमच ईपीएफओमध्ये सामील होणाऱ्या सदस्यांची संख्या, ईपीएफओच्या मधून पडणारे विद्यमान सदस्य आणि ईपीएफओ नोंदणीतून बाहेर पडून, पुन्हा एकदा सामील झालेले सदस्य, अशी दोन्ही आकडेवारी मिळवून, त्या आधारे, निव्वळ मासिक पेरोल साठीची संख्या निश्चित केली जाते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्राचीन श्री शिव मंदिर परिसर में सामूहिक होलिका दहन

Tue Mar 26 , 2024
नागपुर :- बेलीशॉप रेलवे कॉलोनी, कामठी रोड स्थित प्राचीन श्री शिव मंदिर में पारंपरिक पूजा अर्चना कर होलीकादहन किया गया। सभी ने अच्छे स्वास्थ्य, समाज से बुराइयों का नाश करने, सहित विश्व कल्याण की प्रार्थना की। इस अवसर पर कॉलोनी के सभी श्रद्धालु बड़ी संख्या में उपस्थित थे। गोलीकादहन के अवसर पर मंदिर की ओर से अशोक नंदे परिवार मुख्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com