खून करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल 

कळमेश्वर :- अंतर्गत निमजी खदान, ०८ किमी दक्षिण. दिनांक २४/०८/२३ चे अंदाजे ०७/३० ते ०८/०० दरम्यान, मृतक रामबदन उत्तरी पासवान, वय ४० वर्ष याचे प्रेत हे निमजी खदान येथील तलावाचे पाण्यात मिळून आल्याने सदरचे प्रेत हे बाहेर काढून पाहणी केली असता, सदर मृतकाचे डोक्याचे टाळूवर मोठी गंभीर जखम दिसून आल्याने त्यास अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून कोणत्यातरी जाड व तिक्ष्ण हत्याराने डोक्यावर मारून जिवानिशी ठार मारले.

सदर प्रकरणी फिर्यादी नामे- राजेश उत्तरी पासवान, वय ३७ वर्ष, रा. पिपरा मुरेरी, त. महाराजगंज, पोलीस थाना- घोगली, जि. गोरखपूर (यूपी), ह.मु पाटनसावंगी खदान, ता. सावनेर जि. नागपूर,  यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. कळमेश्वर येथे अज्ञात आरोपीविरूद्ध कलम ३०२ भादवि वा गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री यशवंत सोलसे पोस्टे कळमेश्वर हे करीत आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 57 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Sat Aug 26 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (25) रोजी शोध पथकाने 57 प्रकरणांची नोंद करून 49400 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com