कोळसा वाहतुक धुळीचे प्रदुर्शन रोखण्यास वराडा सरपंचा सह शेतक-याने केले रास्त्यावर आंदोलन

आठ दिवसात कोळसा वाहतुक धुळ प्रदुर्शनाव र उपाययोजना करण्याचे अधिका-यांची कबुली.    
 
कन्हान : –  गोंडेगाव खुली कोळसा खदान कोळसा ट्रक वाहतुकीने होणा-या कोळसा धुळीच्या प्रदुर्शनाने वराडा व परिसरातील नागरिक त्रस्त असुन वारंवार हे कोळसा धुळीचे प्रदुर्शन रोखण्यास उपाययोजना कर ण्याची मागणी केली. पावसाळा जवळ येऊन सुध्दा वेकोलि गोंडेगाव अधिकारी दुर्लक्ष करित असल्याने वराडा सरपंचा विद्याताई चिखले यांच्या नेतुत्वात शेत करी नागरिकांनी गोंडेगाव अण्णामोड डुमरी रोडवरील नागठाना जवळ रस्त्यावर आंदोलन करून ट्रकच्या  कोळसा वाहतुकीने मोठया प्रमाणात होणारे धुळीचे प्रदुर्शन रोखण्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवि ण्यास बाध्य केले.

         वेकोलि गोंडेगाव उपक्षेत्र अंतर्गत खुली कोळसा खदान ट्रक व्दारे महाजनको करिता डुमरी रेल्वे कोळ सा यार्ड व बाहेर इतर स़्थळी कोळसाची वाहतुक ही गेोंडेगाव खुली खदान ते महामार्गा वरील अण्णा मोड पर्यंत मोठया प्रमाणात ट्रक चालक कोळसा टाळपत्री ने बहुतेक न झाकता करित असल्याने रस्त्यावर व आजुबाजुला कोळसाची धुळ उडुन रस्त्या लगत थर साचुन व शेतात जाऊन शेतपिकाचे नुकसान होते. रस्त्याच्या कडे ला लावलेली बांबुची झाडे मोठी होऊन रस्त्यावर झुकल्याने रस्त्याने ये-जा करणारे दुचाकी चालक व पायदळी लोकांना ट्रक आल्यावर उडणा-या धुळीने काहीच दिसत नसल्याने रस्त्याच्या बाजुला होताना साचलेल्या धुळीने चाके किंवा पाय घसरून पडुन अपघाताला बळी पडावे लागते.
           वाकलेल्या बांबुचा मार लागुन जख्मी व्हावे लागते. यामुळे बेधुंद चालणा-या कोळसा ट्रकने अपघात होऊन निर्दोष लोकाचा बळी जातो किंवा शारिरिक अपंगत्वास येते. यास्तव गोंडेगाव उपक्षेत्र प्रबंधकास वारंवार ग्राम पंचा यत व शेतकरी नागरिकांनी पत्र देऊन ट्रकच्या कोळसा वाहतुकीमुळे मोठया प्रमाणात होणारे धुळीचे प्रदुर्शन रोखण्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची  विनंती करून सुध्दा वेकोली प्रशासन दुर्लक्ष करित  असल्याने पावसाळा जवळ येऊन सु़ध्दा वेकोलि कोळ सा वाहतुकीचे धुळ प्रदुर्शन रोखण्याचे उपाय करित नसल्याने ग्राम पंचायत वराडा सरपंच, उपसरपंच च्या नेतुत्वात वराडा परिसरातील शेतक-यांनी गोंडेगाव ते अण्णा मोड रस्त्यावरील नागठाना जवळ रस्त्यावर आंदोलन केल्याने काही काळ ट्रकची कोळसा वाहतु क ठप्प झाल्याने गोंडेगाव प्रबंधक भुपेंद्र पटोरिया,  सिव्हील इजिनिअर अन्सारी आणि पोलीस सहाय्यक महादेव सुरजुसे ताफ्यासह पोहचले असता आंदोलक शेतक-यांनी म्हटले की, या रस्त्यावर साचलेला कोळ सा धुळीचा थर उचलुन दुर दुसरी कडे फेकण्यात यावा .
                    रस्त्यावर पाणी मारण्यात यावे, रस्त्याकडे वाकलेल्या बांबुच्या झाडाची व्यवस्थित छटाई करावी. कोळसा ट्रक च्या वाहतुकीने होणा-या कोळसा धुळीच्या प्रदुर्श नावर योग्य उपाययोजना जोपर्यंत करण्यात येणार नाही तोपर्यंत येथुन कोळसा ट्रकची वाहतुक होऊ देणार नाही. या भुमिकेवर आंदोलक ठाम असल्याने वेकोलि अधिका-यांनी वरिष्ठाशी बोलुन त्वरित बुलडो जर ने रस्त्यावरील व लगतचा कोळसा धुळीचा थर जमा करून उदया पासुन ट्रक्टर ने दुर वेकोलि च्या जागेत फेकण्यात येईल, मजुर लावुन बांबुची व्यवस्थि त छटाई करण्यात येईल. कोळसा टाळपत्रीने झाकुन ट्रकने वाहतुक कऱणे ट्रक चालकाना अनिवार्य करून कोळसा वाहतुकीच्या धुळीच्या प्रदुर्शनावर उपयायोज ना येणा-या आठ दिवसात करण्याचे आश्वस्त करित  बुलडोजर बोलावुन रस्त्यावरील व लगत धुळीस जमा करण्याचे काम सुरू करण्यात आल्याने कोळसा वाह तुक सुरू करण्यात आली. याप्रसंगी ग्रा प वराडा सरपंचा विद्याताई चिखले, उपसरपंच उषाबाई हेटे, ग्रा प सदस्या संगिताबाई सोनटक्के, सदस्य संजय टाले, कविता मेश्राम, सुभागी घारड, कल्पना घाटोळे, दिलीप चिखले, आनंदराव गुरांदे, किशोर चिखले, विजय घाटोळे, मारोती जामदार, सुरेशजी हेटे, हर्षल नेवारे, संजय मेश्राम, मंगेश खंडार, श्रावण पाटील सह परिसरातील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली नागरिकांची गऱ्हाणी

Tue Jun 7 , 2022
जिल्हास्तरीय लोकशाही दिन नागपूर :-  आज महिन्याचा पहिल्या सोमवारी  लोकशाही दिनाचे एक आगळेवेगळे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात करण्यात आले होते. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी स्वत: लोकशाही दिनात सहभागी तक्रारकर्त्यांचे गऱ्हाणी जाणून घेतल्या. त्यांचे निराकरण वेळेत पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले.  पोलीस विभागाने संबंधित प्रकरणाचा तपास करुन तत्काळ निकाली काढावे व गुन्हा दाखल करावा.  महसूल विभागांनी प्रकरणे 15 दिवसात निकाली काढावे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com