राजधानीत यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी 

नवी दिल्ली :- संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज दोन्ही महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.

            कॉपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस तसेच, कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. प्रतिमा गेडाम व स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, यशवंतराव चव्हाण यांची जयंती महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहीली. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना जयंती निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन

Tue Mar 12 , 2024
नागपूर :- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त मंगळवारी नागपूर महानगरपालिकातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रम मध्ये स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले. या वेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा, अधिक्षक अभियंता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com