मालाड सामान्य रुग्णालयात येत्या तीन महिन्यात दहा डायलेसिस मशीन सुरू करणार – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई :- मालाड सामान्य रुग्णालय येथे मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर व मॉड्युलर प्रसूतीगृहामुळे रुग्णांना निर्जतुक वातावरण उच्च प्रतीची आरोग्य सेवा मिळणार असून, माता मृत्यू तसेच नवजात शिशु मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. तसेच आगामी तीन महिन्यात दहा डायलेसिस मशीन देखील बसवण्यात येणार आहेत अशी माहिती कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मालाड येथील सामान्य रुग्णालय येथे शस्त्रक्रिया गृह व प्रसूतीगृहाचे अत्याधुनिकरण या कामाचे उद्घाटन करताना पालकमंत्री लोढा बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, स्थानिक नगरसेवक, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, व इतर अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री लोढा म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सामान्य रुग्णालयात मॉडयूलर ऑपरेशन थिएटर व मॉडयुलर प्रसूतीगृह हे प्रतिजैविक व पृष्ठभाग (Antimicrobial surface ) व निर्जंतुकीकृत हवा ( Laminar sterilized air flow) असल्यामुळे रुग्णांना कोणत्याही प्रकारे तीव्र संसर्ग आणि इतर रोगराईपासून प्रतिबंध करण्यास सहाय्य ठरणारी अशी ही यंत्रणा आहे. या नव्या सुविधेमुळे रुग्णांना निर्जंतुक वातावरण, उच्च प्रतीची आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. देशात माता व नवजात शिशु मृत्युचे मुख्य कारण हे जंतूसंसर्ग (इन्फेक्शन्स) आहे. हा धोका कमी करून मॉडयूलर प्रसुतीगृह हे जंतूसंसर्गाचा धोका कमी करून माता मृत्यू तसेच नवजात शिशु मृत्यदराचे प्रमाण कमी करण्यास साह्यभूत ठरेल. राज्य शासनाचे एकमेव सामान्य रुग्णालय मुंबई उपनगरात कार्यरत असून ते अद्यावत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व मॉड्युलर प्रसूतीगृह याने सुसज्ज करण्यात आल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Two Private Buses Collided in Malkapur Condolences From Chief Minister, Aid announced to the families of the deceased

Sat Jul 29 , 2023
Mumbai :-  Chief Minister Eknath Shinde has expressed grief over the accident that occurred today as two private buses collided on the railway flyover on National Highway No. ६ in Malkapur (District Buldhana). The Chief Minister has collected information about the accident from the Buldhana District Collector and has instructed to provide aid of Rs. ५ lakhs each to the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com