दिव्यांग मुलांना शालेय गणवेश व बॅग वाटप

– भारतीय जैन संघटना सेन्ट्रल नागपूर कडून आयोजन

रामटेक :-स्वर्गीय सुगतचंद्रजी तातेड यांच्या स्मृती प्रीत्यर्थ भारतीय जैन संघटना नागपूर कडून सुरज मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा , एकविरा मतिमंद मुलांचे बालगृह काचुरवाही व स्नेह सदन मतीमंद मुला- मुलींची विशेष अनिवासी / निवासी शाळा शितलवाडी ता. रामटेक जि. नागपूर शाळेत दिव्यांग मुलांना १७५ शालेय गणवेश व १७५ बॅग चे वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांग मुले अतिशय आनंदी झालेत.

कार्यक्रमा ला यावेळी जितेंद्र बोथरा, मोहित बोथरा, सी.ए. रूपंम बरडिया, सी.ए. सरिता बरडिया, पूजा तातेड, अर्चना श्रावणे, एजुकेअर प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर उपस्थित होते तसेच यावेळी भारतीय जैन संघटना रामटेक चे अध्यक्ष पंकज टक्कामोरे , उपाध्यक्ष नीरज जैन , सचिव प्रशांत टक्कामोरे सह मतिमंद युवक विकास शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश कुंभलकर, संस्थापक गणेश गोल्हर, विलास फटिंग , शाळा प्रमुख टि पी जुनघरे ,दिव्यांग व निराधार बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष तुलसीराम अतकर, कोषाद्यष छाया अतकर, शाळेचे मुख्याध्यापक पंकज पांडे सह शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी,पालक, मुले बहुसंख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

१९ व २० जुलै ला दोन दिवसीय पुरुष नसबंदी शिबीर

Mon Jul 17 , 2023
– लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा चे औचित्य रामटेक :- जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्त साधून तथा लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा निमित्त ला प्राथमिक आरोग्य केन्द्र हिवरा बाजार आणी प्रा.आ. केंद्र करवाही यांच्या संयुक्त विघमाने हिवरा बाजार येथे तर प्राथमिक आ.केन्द्र भंडारबोडी, नगरधन व मनसर द्वारे दि.२० जुलै ला मनसर येथे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या तालुक्यातील सर्व पुरुष मंडळीनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com