बुद्ध विहाराचे 1 कोटी 15 लक्ष रुपये गेले परत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- प्रत्येक बुद्ध विहारात धम्म साधनासह वाचनाची सुद्धा सोय व्हावी यासाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या यशस्वी प्रयत्नातून कामठी शहरातील 24 बुद्धविहाराची निवड करून त्यात समाजभवन व ई लायब्रेरी चे बांधकाम करण्याचे नियोजित करण्यात आले होते मात्र तालुका विकास आराखडा वीभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षनात यातील काही बुद्ध विहार हे नियमात बसत नसल्याच्या नावाखाली काही बुद्ध विहार बांधकामाचे काम रद्द करुन 10 बुद्ध विहाराचे समाजभवन व ई लायब्रेरी बांधकाम मंजूर करण्यात आले व त्यासाठी कामठी नगर परिषद ला सन 2017-18 मध्ये दलित वस्ती समाजभवन निधीचे 5 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला मात्र शासकीय धोरणानुसार अखर्चित निधीं परत करण्याच्या आदेशानुसार यांतील शिल्लक असलेला 1 कोटी 15 लक्ष 24 हजार 123 रुपयांचा निधी परत करीत शासकीय कोषागारात जमा करण्यात आला आहे.

 

मंजूर बुद्ध विहाराचे समाजभवन व ई लायब्रेरी बांधकामासाठी शासनाच्या दलित वस्ती समाजभवन निधीतील 5 कोटी निधींनुसार 10 बुद्ध विहाराचे बांधकाम निविदा काढण्यात आले होते ज्यामध्ये प्रभाग क्र 3 येथील नागसेन नगर , प्रभाग क्र 16 मध्ये आययुडीपी परिसर, प्रभाग क्र 3 मध्ये मोदी नंबर 3,प्रभाग क्र 13 मध्ये जयभीम चौक, प्रभाग क्र 11 मध्ये हमालपुरा,प्रभाग क्र 15 मध्ये रमानगर, गौतम नगर, प्रभाग क्र 7 मध्ये कचरिपुरा, प्रभाग क्र 1 मध्ये कोळसाटाल,तसेच प्रभाग क्र चार चा समावेश होता यातील काहींनी विरोध तर काहींनी सकारात्मक भूमिका दर्शविल्याने झालेल्या कामातुन छत्रपती नगर मधील 1,हमालपूरा 1,बजरंग पार्क 1, तसेच जयभीम चौकातील 1 असे फक्त चार बुद्ध विहाराचे बांधकाम पूर्णत्वास आले . यानुसार मागील काळात कोरोनामुळे शासन आर्थिक संकटात सापडल्याने 31 मे पर्यंत शिल्लक असलेला निधी सर्व कार्यालयानी तात्काळ परत करावा अशा सूचना दिल्या होत्या त्यामुळे या बुद्ध विहार बांधकामाचा उर्वरित 1 करोड 15 लक्ष 24 हजार 123 रुपयांचा निधी शासन दरबारी जमा करण्यात आला होता तर 24 बुद्ध विहारापैकी फक्त चार बुद्ध विहाराचे बांधकाम नावीन्यपूर्ण झाले हे इथं विशेष!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

किलोचे तीन पाव देणार्‍यांची स्पर्धा

Tue Feb 7 , 2023
– आठवडी बाजारात ग्राहकांची सर्रास लूट – ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी नवी शक्कल – पथकावर हल्ले, विक्रेत्यावर दंड नागपूर :- आठवडी बाजारात एक भाजीविक्रेता 40 रुपये किलो प्रमाणे तर दुसरा 20 रुपये किलो प्रमाणे भाज्या (एकच वस्तु) विकतो. स्वस्त विकणार्‍याकडे ग्राहकांची गर्दी असते तर महाग विकणार्‍यांकडे ग्राहक फिरकत नाही. मात्र, येवढे स्वस्त कसे काय? असा प्रश्न ग्राहकाला पडत नाही, आणि येथेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com