संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भाजपातर्फे अभिवादन

नागपूर :- भारतीय संविधान दिनानिमित्त शुक्रवारी २६ नोव्हेंबर रोजी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले.

संविधान चौकामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भारतीय जनता पार्टीचे डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम व प्रा संजय भेंडे, माजी आ. डॉ मिलिंद माने, अनू जाती मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश शिरस्वान यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

यावेळी भारतीय जनता पार्टी आर्थिक प्रकोष्ठ प्रदेश स्क्योजक मिलिंद कानडे, भैय्यासाहेब बिघाने, दिलीप हातीबेड, सुधीर जांभुळकर, शंकर मेश्राम, इंद्रजीत वासनिक, हिमांशू पारधी, राजेश नंदेश्वर, राजेंद्र सायरे, अजय करोसिया, वत्सला मेश्राम, अंतकला मनोहरे, सुनील तुर्केल, अविनाश धमगाये, रमेश वानखेडे, कैलाश कोचे, संदीप बेले, श्रीकांत माटे, अजय गजभिये, रोहित बढेल, दिलीप मेश्राम, आनंद अंबादे, केवल बागडे, चंद्रपाल सोनटक्के, कैलाश वाघमारे, सीमा मेश्राम, रिना सोमकुवर, रंजना बन्सोड, निखिल गोटे, रामकृष्ण भिलकर, अनिकेत शेंडे, कैलाश खेरकर, प्रवीण चावरे, स्वप्नील भालेराव आदी उपस्थित होते.

आपले भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीयाला एकसंघ ठेवण्याचे महत्वाचे कार्य करते. संविधानाने प्रत्येकाला त्याचे मुलभूत अधिकार बहाल केलेले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चतु:सुत्रीचा आधार घेउन निर्मिलेले संविधान आज प्रत्येक भारतीयाच्या मनामनात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची रुजवणूक करण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आदिलाबाद शहर घर-घर में जनसंपर्क करते कांग्रेसी

Sun Nov 26 , 2023
आदिलाबाद :- तेलंगाना में शुरू विधानसभा चुनाव के दौरान स्थानीय उम्मीदवारों के प्रचारार्थ घर घर पहुंच अपनी बात रख रहे कांग्रेसी पदाधिकारी व आदिलाबाद विधानसभा के ओवज़र्वेर सय्यद गौसुद्दीन।इनके साथ स्थानीय कांग्रेसी नेता सह उम्मीदवार सह समर्थक जोर लगा रहे है। Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com