ट्रकच्या धडकेत ऑडी कार चे नुकसान, ट्रक जप्त

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड बोरी सिंगोरी शिवारात ट्रक चालकाने कोणतेही इंडिकेटर न देता ट्रक मागे (रिवर्स) घेऊन उभ्या असलेल्या कार ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ऑडी कारचे मोठे नुकसान झाल्याने पोलीसांनी ट्रक ला ताब्यात घेऊन ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.२८) एप्रिल ला नंदु रामजी कठाने वय २८ रा. वार्ड क्र. १७ राम नगर खापरखेडा रोड पारशिवनी हे आपल्या ऑडी या चारचाकी कार क्र. एम एच १४ डी.टी ४४९९ ने सावरगाव येथे परिवारासोबत साळुभाऊ निलकंठ ठाकरे यांचा कार्यक्रमात गेले होते. कार्यक्रम आटपुन नंदु सायंकाळी आपल्या परिवारा सह आपल्या ऑडी कार ने पारशिवनी ला जाण्याकरिता निघाले असता तारसा रोड वरील बोरी (सिंगोरी) शिवारात रोडचे काम सुरु असल्याने कार समोर सहा चक्का आयसर ट्रक चाळीस फुट अंतरावर उभा होता. तो मागे येऊ शकतो म्हणुन नंदु ने आपली कार रोडावर उभी केली असता ट्रक क्र. एम एच ४० ए के ६४८९ च्या चालक सुखराम पतीराम बोंन्द्रे याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन कोणतेही इंडिकेटर न देता ट्रक मागे (रिवर्स) घेऊन उभ्या असलेल्या कार च्या उजव्या बाजुला जोरदार धडक मारल्याने वाहनाचे तीन लाखांचे नुकसान झाले असुन कुठलीही जीवीत हानी झाली नाही. कन्हान पोलीसांनी नंदु कठाने यांचे तक्रारीने ट्रक जप्त करुन आरोपी सुखराम पतीराम बोंन्द्रे याचे विरुद्ध कलम २७९ भादंवि १८४, १८५, २३३, २४९, १७७ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ - माळशिरस, धाराशिव, लातूर येथील सभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

Wed May 1 , 2024
लातूर :- दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली, पाण्यासाठी वणवण करायला लावले, त्याचा हिशेब करून त्याची शिक्षा त्या नेत्याला देण्याची वेळ आली आहे, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शरद पवार यांच्यावर माळशिरस, धाराशिव, लातूर येथे झालेल्या सभांतून जोरदार हल्ला चढविला. तीव्र उन्हाळ्याने महाराष्ट्र तापलेला असतानाही, आज मंगळवारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com