“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

45 हजार महिलांची आरोग्य तर 34 हजार महिलांची रक्त तपासणी

28 हजार महिलांची असंसर्गजन्य आजाराची तपासणी

नागपूर :- ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जास्तीत जास्त महिलांनी या अभियानाचा लाभ घ्यावा व आरोग्य सुदृढ करावे असे आवाहन केले. या अभियानास उत्फूर्त प्रतिसाद मिळला आहे.

या मोहिमेत 26 ऑक्टोबर 5 ऑक्टोबरपर्यंत 18 वर्षावरील महिला, गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता यांनी सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा देण्यात येत आहे, जिल्ह्यातील सद्यस्थिती याप्रमाणे आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून 18 वर्ष वयोगटातील 45 हजार 570 महिलांची तपासणी करण्यात आली आहे.

34 हजार 140 महिला लाभार्थ्यांची रक्तदाब तपासणी करण्यात आली आहे. 803 महिला लाभार्थ्यांचे छातीचे एक्सरे काढण्यात आले. 3 हजार 673 महिलांची दंतरोग तपासणी करण्यात आली. असंसर्गजन्य आजार वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून 30 वर्ष वयोगटातील 28 हजार 218 महिलांची तपासणी करण्यात आली. 1 हजार 382 गरोदर महिलांचे टीडी लसीकरण व 1 हजार 672 महिलांची स्त्री रोग तज्ञांमार्फत तपासणी तर 1 हजार 49 महिलांची सोनोग्राफी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली आहे.

आतापर्यंत माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत महालगाव, भिवापूर,पिपळा, पेवठा, सालई, गोधनी, धरमपूर, सोमनाळा व गादा, भंडारबोडी, कोंढाळी व तरोडा, डवलापार, येथे महिला आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाचा लाभ जिल्हयातील जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा व मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुमित्रा कुंभारे यांनी केले आहे.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com